शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

Organ Donation: हॉस्पिटलमधून ‘अलर्ट कॉल’ येतो, पण यकृतच मिळत नाही..! राज्यात आजमितीला १,३३१ रुग्ण यकृताच्या प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 12:47 PM

Organ Donation: रुग्णालयातून अलर्ट कॉल आला की धाकधूक होत असल्याचे, रोडा इच्छापोरीया (७०) यांचे पती पर्सी इच्छापोरीया (७१) यांनी ‘लोकमत’ला सांगितले. राज्यात आजमितीला १,३३१ रुग्ण यकृताच्या प्रतीक्षेत आहेत.

- संतोष आंधळेमुंबई : आतापर्यंत सहा वेळा रुग्णालयातून ‘अलर्ट कॉल’ आला होता, तुम्ही तत्काळ दाखल व्हा, तुम्हाला यकृत मिळाले आहे. हे कॉल मध्यरात्री यायचे. मग, सगळ्या गोष्टी बाजूला सारून मी माझ्या बायकोला घेऊन उपचार सुरू असलेल्या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात घेऊन जायचो. ५-६ तास तेथे काढल्यानंतर सांगण्यात यायचे की, तुम्हाला मिळणारे यकृत हे दुसऱ्या व्यक्तीला वापरण्यात आले आहे. कालांतराने लक्षात आले की, आमच्या आधी यकृताच्या प्रतीक्षा यादीत नाव असणाऱ्या रुग्णांसोबत आम्हालाही पर्यायी व्यवस्था म्हणून बोलाविले जात आहे, जर आमच्या आधीचा रुग्ण काही कारणास्तव शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरला नाही तर आम्हाला ते यकृत मिळणार होते, परंतु प्रत्येक वेळी आमच्या पदरी निराशा आली. त्यामुळे रुग्णालयातून अलर्ट कॉल आला की धाकधूक होत असल्याचे, रोडा इच्छापोरीया (७०) यांचे पती पर्सी इच्छापोरीया (७१) यांनी ‘लोकमत’ला सांगितले. राज्यात आजमितीला १,३३१ रुग्ण यकृताच्या प्रतीक्षेत आहेत.अंधेरी परिसरात पारसी वसाहतीत राहणाऱ्या रोडा  यांना मे २०२१ मध्ये यकृत निकामी असल्याचे निदान केले गेले. त्याअगोदर २०१५ जुलैला त्यांना स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले होते. त्यातून त्या बऱ्या होऊन बाहेर पडल्या. त्यानंतर शरीरात कुठे कॅन्सरच्या पेशी अजून कुठे आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी  ‘पेट स्कॅन’ करण्यात आले. त्यामध्ये त्यांना कॅन्सर नाही, मात्र यकृत (लिव्हर सिरॉसिस) खराब होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांना यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

 यासाठी जातो अलर्ट कॉलयकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेपूर्वीपर्यंत  रुग्णाला अन्य कोणताही आजार होऊ नये यासाठी आमचा डॉक्टरांचा समूह हा उपचार करत असतो. ‘अलर्ट कॉल’ हा आमच्या कामाच्या पद्धतीचा भाग आहे. मेंदूमृत व्यक्तीकडून यकृत अवयव मिळाल्यानंतर आम्ही प्रतीक्षा यादीवरील २-३ रुग्णांना अतिदक्षता विभागात येऊन थांबण्यास सांगतो. कारण पहिला रुग्ण काही वैद्यकीय कारणास्तव अवयव घेऊ शकला नाही  तर तो अवयव घेणारा रुग्ण तत्काळ उपलब्ध असावा.- डॉ. रवी मोहनका, यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया विभागाचे संचालक, एच एन रिलायन्स फाउंडेशन रुग्णालय

टॅग्स :Organ donationअवयव दानHealthआरोग्य