ऑनलाइन लोकमतअकोला, दि. 30 - चान्नी येथे शेतकऱ्यांच्या बचतगटांनी तयार केलेल्या सेंद्रिय शेतीची माहिती इंग्लंडमधील महिलांनी घेतली. त्यांनी नुकतीच चान्नी येथे स्थापन झालेल्या ८४ शेतकरी सेंद्रिय बचतगटातील शेतकऱ्यांच्या शेतीला भेट दिली. चान्नी येथील प्रकल्प चांगली प्रगती करीत असल्याचे त्यांनी सांगितले. आम्हीसुद्धा आमच्या देशात चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांचे समूह तयार करून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्याकरिता प्रेरित करू, तुम्हाला तुमच्या देशातील शेतकऱ्यांना व सेंद्रिय प्रकल्पाला शासनाचीसुद्धा चांगल्या प्रकारे साथ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. बचतगटातील शांताराम राखोंडे, ज्ञानेश्वर येनकर, देवराव बोदडे, गजानन ताले, नारायण येनकर, सुरेश कळंबे, कुणालदेव सोनोने, चंदनकुमार जैन, गजानन येनकर, गजानन गाडगे, वासुदेव ताले या सर्व शेतकऱ्यांच्या शेतात त्यांनी भेट दिली. यावेळी बायोडायनामिकपासून तयार केलेले कंपोस्ट तरल खत याचे त्यांना प्रात्यक्षिके शेतकऱ्यांनी करून दाखविली. आत्मा समिती पातूर प्रकल्प अधिकारी मंगेश झांबरे हेसुद्धा कार्यक्रमाला हजर होते आणि त्यांनीसुद्धा शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
इंग्लंडच्या महिलांनी घेतली सेंद्रिय शेतीची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2016 7:16 PM