लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शिवसंपर्क अभियानच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासोबतच पक्षाची मजबूत बांधणी करण्यासाठी संघटनेत फेरबदल करणार असल्याचे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव यांनी स्पष्ट केले. यावेळी अकोला, अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्याचा विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानला सुरुवात झाल्याचे चित्र आहे. शिवसंपर्क अभियानच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा शिवसेनेचा प्रयत्न दिसून येतो. शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर संबंधित भागात पक्षाच्या कामगिरीचादेखील आढावा घेतला जात आहे. हा संपूर्ण अहवाल पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर केला जात आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये शिवसंपर्क अभियान राबवल्यानंतर शिवसेनेने त्यांचा मोर्चा पश्चिम विदर्भाकडे वळविला. सोमवारी अकोला, अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय शेतकरी समस्या आणि पक्षाच्या कामकाजाचा इत्थंभूत अहवाल उद्धव ठाकरे यांच्या समक्ष ठेवण्यात आला. पक्ष प्रमुखांनी सर्वप्रथम अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघांचा आढावा घेतला. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत पर्यावरणमंत्री रामदास कदम, पश्चिम विदर्भाचे संपर्क प्रमुख खासदार अरविंद सावंत, खा. विनायक राऊत, आ. गोपीकिशन बाजोरिया,जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, श्रीरंग पिंजरकर, उपजिल्हाप्रमुख बंडूभाऊ ढोरे, रवींद्र पोहरे, दिलीप बोचे, मुकेश मुरूमकार, निवासी उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर उपस्थित होते. बुलडाणा जिल्ह्यातील वादावर मातोश्रीवर तोडगाशिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून पक्ष बांधणीचा आढावा घेणाऱ्या शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समक्ष बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांमधील धुसफूस चव्हाट्यावर आली. आजी-माजी लोकप्रतिनिधींमधील वाद वाढत असल्याचे पाहून पक्ष प्रमुखांनी २० मे रोजी मातोश्रीवर हजर राहण्याचे फर्मान जारी केले. सदर बैठकीला अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले, हे येथे उल्लेखनीय. बुलडाणा जिल्ह्यातून खासदार प्रतापराव जाधव, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील, जिल्हाप्रमुख जालंधर बुधवंत, उपजिल्हाप्रमुख शांताराम दाणे आदींसह युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
पक्ष बांधणीसाठी संघटनेत होणार फेरबदल!
By admin | Published: May 16, 2017 1:26 AM