ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित दहीहंडी उत्सवात गोविंदा पथकांनी ‘नवथरां’ची किमया दाखवत न्यायालयाचे निर्णय पायदळी तुडवल्याने गुन्हे दाखल झाल्याने कार्यकर्त्यांचे कौतुक करण्यासाठी पक्षाध्यक्ष राज ठाकरे रविवारी ठाण्यात येणार आहेत. त्यामुळे आगामी निवडणूक प्रचाराची हंडी राज फोेडणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला होता. ठाणे मनसेने ९ थरांची उभारलेली हंडी ‘जय जवान’ गोविंदा पथकाने फोडून ११ लाखांचे बक्षीस पटकावले. त्याचबरोबर इतरही पथकांनी २० फुटांपेक्षा अधिक उंचीवर थर लावले. त्यामुळे आयोजक शहराध्यक्ष अविनाश जाधव, मनसे उपाध्यक्ष अभिजित पानसे, राजू पाटील यांच्यासह जवळपास २५ पथकांवर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. या सर्वांची भेट राज ठाकरे रविवारी सायंकाळी ५ वाजता ठाण्यातील मनसे कार्यालयात घेणार आहेत. हिंदू धर्मीयांच्या सणांवर येत असलेल्या निर्बंधांविरोधात आक्र मक पवित्रा घेतल्यामुळे गोविंदा पथकांकडूनही राज ठाकरे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
आयोजक, गोविंदांच्या भेटीला राज आज ठाण्यात
By admin | Published: August 28, 2016 3:59 AM