पुणे : शहर व परिसरात सुरू असलेले आपले विविध गृहनिर्माण प्रकल्प, त्यांची रचना याची सर्व माहिती ग्राहकाला एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी व त्यांना त्यांच्या गरजेनुसार स्वप्नातील घरावर खरेदीची मोहोर उमटविता यावी यासाठी पुण्यातील विख्यात बिल्डर कोलते-पाटील यांनी ‘नेट फेस्ट’ या अनोख्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुजय कोलेले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कंपनीने साकारलेल्या १३ प्रकल्पातील सुमारे सहा हजारांपेक्षा जास्त घरांची माहिती या प्रदर्शनाद्वारे ग्राहाकांना मिळू शकेल. या प्रदर्शनात एकाच ठिकाणी कंपनीच्या सर्व प्रकल्पाची माहिती मिळणार असल्याने ग्राहकांना त्यांच्या सोयीचे आणि गरजेनुसार घर निवडणे सुलभ जाणार असल्याचे ते म्हणाले. या प्रदर्शनात घराचे बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी विविध २०० ब्रँडस्वरील तब्बल २० हजारांहून अधिक उत्पादनांवर भरघोस सवलती मिळणार आहेत. तसेच, बुकिंग केलेल्या फ्लॅटसाठी १० वर्षांचा गृहविमा आणि ५ वर्षांसाठीचे अपघात विमा संरक्षणही पुरविले जाणार आहे.दरम्यान, कंपनीने आतापर्यंत एक कोटी चौरस फुटांचे बांधकाम पूर्ण केले आहे. या पत्रकार परिषदेला कंपनीच्या विक्री व विपणन विभागाचे उपाध्यक्ष महेश सलुजा आणि विपणन विभागाचे उपसरव्यवस्थापक गायत्री कुंटे यादेखील उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)