उस्मानाबाद : बेलगाम औषध खरेदी केल्याप्रकरणी तत्कालीन सहाय्यक संचालक (खरेदी कक्ष) तथा येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांना निलंबित करण्यात आले आहे. हे औषध खरेदी प्रकरण ‘लोकमत’ने उजेडात आणल्यानंतर आता संबंधित अधिकाऱ्यांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. आता मंत्रालयातील आरोग्य सेवा संचालनालयाच्या खरेदी कक्षातील तत्कालीन सहाय्यक संचालक व सध्या उस्मानाबाद येथे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ. आर. बी. पवार यांच्याविरूद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)रजिस्टर खेरदीचीही चौकशीडॉ. आर. बी. पवार हे येथे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत असताना आरोग्य केंद्रांसाठी तब्बल २० ते २१ लाखांची रजिस्टर खरेदी करण्यात आली होती. जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे यांनी हे प्रकरण सर्वसाधारण सभेत उपस्थित केले होते. बाजार भावापेक्षा चढ्या दराने खरेदी झाल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. याची चौकशी सुरू झाली असली तरी अहवाल आलेला नाही. त्यामुळे या चौकशीतून काय समोर येते? याकडेही अनेकांचे लक्ष लागून आहे.
उस्मानाबादचे जिल्हा आरोग्य अधिकारी निलंबित
By admin | Published: April 17, 2016 1:45 AM