शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
2
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
3
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
4
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
5
अदानी मुद्द्यावर 'इंडिया आघाडीत' फूट? टीएमसीने काँग्रेसला फटकारले
6
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
7
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
8
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट
9
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
10
PPF ची जादू : ₹१.७४ कोटी व्याजातून कमावाल; मॅच्युरिटीवर मिळतील ₹२.२६ कोटी, पाहा सोपा फॉर्म्युला
11
Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...
12
अखेर विकी कौशलच्या 'छावा'ची रिलीज डेट जाहीर! २०२५ मध्ये या खास दिवशी रिलीज होणार सिनेमा
13
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
14
माउलींनी संजीवन समाधी घेतली तेव्हा विठ्ठल रखुमाईलाही अश्रु अनावर झाले, तो आजचाच दिवस!
15
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
16
Finally Divorced... ऐश्वर्या आणि धनुष यांच्या घटस्फोटाला 2 वर्षानंतर कोर्टाकडून मान्यता
17
खांदे पालट झाल्यावरही श्रेयस-अजिंक्य यांच्यात गोडी; पुणेकर ऋतुराज-राहुलवर भारी पडली मुंबईकर जोडी
18
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
19
बावीस वर्षांचे कोवळे वय, तरी इहलोकीचे अवतार कार्य संपवून माउलींनी परलोकीची धरली वाट!
20
"तिने याआधीही ४-५ वेळा...", जिया खान आत्महत्या प्रकरणावर सूरज पांचोलीच्या आईची प्रतिक्रिया

अन्यथा अधिकाऱ्यांना जंगलात पाठवू..!

By admin | Published: February 03, 2017 1:23 AM

प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानाच्या कबरीजवळील अतिक्रमणे हटवण्याचा आदेश देऊन बरीच वर्षे उलटूनही या आदेशाची अंमलबजावणी करण्यात

मुंबई : प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानाच्या कबरीजवळील अतिक्रमणे हटवण्याचा आदेश देऊन बरीच वर्षे उलटूनही या आदेशाची अंमलबजावणी करण्यात न आल्याने उच्च न्यायालयाने वनअधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. अधिकाऱ्यांनी येथील अनधिकृत बांधकामे तत्काळ हटवावीत अन्यथा त्यांना कारागृहात किंवा तेथेच जंगलात पाठवू, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने अधिकाऱ्यांना ताकीद दिली.असलेल्या अफजल खानाच्या कबरीजवळील सर्व बेकायदेशीर बांधकामे पाडा, असा आदेश उच्च न्यायालयाने वनविभागाला २००८ मध्ये दिला होता. मात्र वनविभागाने या आदेशाची दखल न घेता बांधकामाना हातही न लावल्याने याचिकाकर्ते मिलिंद एकबोटे यांनी २०१० मध्ये न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली. कबर कोणाच्या जागेत आहे आणि अतिक्रमणे कोणाच्या जागेवर आहेत? असा सवाल खंडपीठाने सरकारी वकिलांना सुनावणीत केला. त्यावर सरकारने कबर महसूल विभागाच्या अखत्यारित येत असलेल्या जमिनीवर आहे तर अतिक्रमणे वन विभागाच्या जागेवर आहेत, अशी माहिती खंडपीठाला दिली.त्यावर संतप्त होत खंडपीठाने म्हटले की, वारंवार आदेश देऊनही वन अधिकारी अनधिकृत बांधकामे हटवत नसतील तर आम्ही त्यांची रवानगी कारागृहात करू किंवा कायमचेच जंगलात पाठवू अशी ताकीद दिली. (प्रतिनिधी) काय कार्यवाही केली ते सांगा...- वनविभागाच्या हद्दीत किती अनधिकृत बांधकामे आहेत? ती कधी बांधण्यात आली आणि कधी तोडण्यात आली? आदेशानंतर किती बांधकामे तोडलीत, याचीही संपूर्ण माहिती संबंधित अधिकाऱ्याने प्रतिज्ञापत्राद्वारे द्यावी. ही माहिती आम्हाला दिली नाही तर आम्ही वनसंवर्धकाला समन्स पाठवण्यास मागेपुढे पाहणार नाही. असे खंडपीठाने सांगितले.