मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला शब्द पाळत मुस्लिम आरक्षणाचा निर्णय घ्यावा. मुस्लिमांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण लागू करण्यासाठी तातडीने अध्यादेश काढावे, अन्यथा काँग्रेस राज्यभर तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा माजी मंत्री व काँग्रेस नेते आ. नसीम खान यांनी दिला.काँग्रेस प्रदेश कार्यालयात बोलताना नसीम खान म्हणाले की, मुस्लिम आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाचे त्यांना स्मरण करुन देण्यासाठी काँग्रेसने पक्षातर्फे राज्यातील प्रत्येक जिल्हाधिका-याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. मुुस्लिम समाजातील मागास प्रवर्गासाठी काँग्रेस-आघाडी सरकारच्या काळात आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती. मात्र, भाजपा सरकारने जाणीवपूर्वक हा अध्यादेश व्यपगत होवू दिला. विशेष म्हणजे न्यायालयाने मुुस्लिमांचे शैक्षणिक आरक्षण अबाधित ठेवले असताना सरकारची ही कृती मुस्लिम समाजाबाबतची उदासीनता दाखविणारी असल्याचे खान म्हणाले. मौ. आझाद महामंडळासाठीची तरतूद ५०० कोटीवरुन १ हजार कोटी करण्याची शासनाची घोषणा समाजाची दिशाभूल असल्याचे खान यावेळी म्हणाले. आधीच्या वर्षातील २०० कोटी महामंडळाला देणे बाकी आहे. यातही सरकारने तब्बल ६० टक्क्यांची कपात केल्याचा आरोप खान यांनी केला.
...अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा
By admin | Published: September 09, 2015 1:18 AM