ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - मराठा व धनगर आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने १५ दिवसांत निर्णय घेतला नाही तर गुजरातसारखी परिस्थिती राज्यातही दिसेल असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.
पटेल समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवरुन गुजरातमधील वातावरण चांगलेच तापले आहे. यापार्श्वभूमीवर राज्यातील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा व धनगर आरक्षणाचा प्रश्न उपस्थित केला आहे. मराठा, धनगर व मुस्लिम आरक्षणाचा तिढा १५ दिवसांत सोडवा अन्यथा मंत्र्यांना राज्यात मंत्र्यांना फिरु देणार नाही असा इशाराच त्यांनी दिला आहे. राज्यातील दुष्काळ हा निसर्गनिर्मित नसून सरकारी अनास्थेमुळेच दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे अशी टीका विखे पाटील यांनी केली आहे. कृत्रिम पावसाचा प्रयोग अयशस्वी ठरला आहे. ज्या भागात पाऊस पडत होता त्याच भागात विमान घेऊन गेले व कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी झाल्याचा दावा केला असा चिमटाही त्यांनी राज्य सरकारला काढला.