‘‘आपला देश पूर्वी सहिष्णू होता आणि आजही आहे. आपल्या देशाचे मूळ सहिष्णूच आहे. सत्याकडे जाण्यासाठी दोन वा अनेक मार्ग असले, तरी संघर्ष व्हायला नको. साहित्यिकांनी समाजाला, आम्हाला विचार व दिशा देण्याचे कार्य करावे. साहित्यातून केवळ प्रश्न निर्माण होऊ नयेत, उत्तरेही मिळाली पाहिजेत,’’ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. साहित्य संमेलनाने इतर वादांपासून दूर राहावे. गतवर्षी घुमानमध्ये साहित्य संमेलन झाले. आज गुरू गोविंदसिंग यांच्या जयंतीदिवशी पिंपरी-चिंचवडमध्ये साहित्य संमेलनाचे उद्घाटन होत आहे, हा योगायोग आहे. साहित्य संमेलनाने भौगोलिक सीमा पार केल्या. आता साहित्यिकांनीही त्या पार कराव्यात. आपल्या भाषेतून इतर भाषेत गेले पाहिजे. मराठी जागतिक भाषा झाली, तर वैश्विक भाषेचे रूप घेईल, यात शंका नाही. संत ज्ञानेश्वरांच्या मराठीतील पसायदानामध्ये वैश्विक विचार आहेत. मराठी ज्ञानभाषा झाली पाहिजे. वृक्षवल्ली राहिलेली नाही. त्यामुळे शेतकरी दुष्काळात होरपळत चालला आहे. त्यामुळे सर्वांनी अंतर्मुख झाले पाहिजे. शेतकऱ्यांनाही ‘या जन्मावर शतदा प्रेम करावे,’ असे मंगेश पाडगावकर यांच्या कवितेप्रमाणे वाटले पाहिजे. समाजात प्रश्न निर्माण करण्यापेक्षा सकारात्मक विचार देणारे साहित्य आणले पाहिजे. सामाजिक जीवनात लेखकांचे विचार कोणीही संपवू शकत नाही. सीमाबांधवांच्या पाठीशी...शरद पवार यांच्या भाषणावेळी बेळगाव, कारवार सीमाप्रश्नांसाठी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठीशी आम्ही आहोत. मराठी माणूस जिवंत आहे, तोपर्यंत सीमाप्रश्नाचा लढा सुरू राहील.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
आपला देश सहिष्णूच : देवेंद्र फडणवीस
By admin | Published: January 17, 2016 1:04 AM