शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

'संभाजीनगर' नामकरणाला आमचा पाठिंबा; काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचे मोठे विधान

By ओमकार संकपाळ | Published: July 07, 2022 9:58 PM

'औरंगजेबाने स्वतःच्या वडिलाची हत्या केली, हा विषय कोण्या एका समाजापुरता मर्यादित नाही.'

औरंगाबाद: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या अखेरच्या मंत्रिमंडळ बैठकीत(दि.29 जून) औरंगाबादचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशीव करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यावरून राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. एकीकडे, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (imtiaz jaleel) यांनी या विरोधात रस्त्यावर उतरून लढा देण्याचा इशारा दिला आहे. मात्र, दुसरीकडे काँग्रेसने या नामांतराला पाठिंबा दर्शवला आहे.

'संभाजीनगर नावाला पाठिंबा'या निर्णयाचा एमआयएमने विरोध केला असला तरी, काँग्रेसने मात्र याचे समर्थन केले आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी याबाबत महत्वाची प्रतिक्रिया दिली. माध्यमांशी संवाद साधताना अशोक चव्हाण म्हणाले की, 'औरंगजेबाने स्वतःच्या वडिलांची हत्या केली होती, त्याची इतिहासातही नोंद आहे. मुद्दा इतकाच आहे की, हा विषय कोण्या एका समाजापुरता मर्यादित नाही. हा विषय संभाजी महाराजांबद्दल ज्या भावना आहेत, त्याचा आहे. त्यामुळे औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर व्हावे, याला काँग्रेसचा विरोध असण्याचे कारण नाही.'

जलील काय शहराचा बादशाह आहे का? दरम्यान, शिवसेनेचे औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांच्यावर निशाणा साधला. जलील म्हणाले होते की, औरंगाबादचे संभाजीनगर होऊ देणार नाही. त्यांनी काल बैठकही घेतली, असे विचारले असता शिरसाट म्हणाले, इम्तियाज जलील काय या शहराचा बादशाह आहे का? कोण इम्तियाज जलील? इथली जनता महत्वाची आहे आणि हा शिवसेना प्रमुखांचा शब्द आहे. औरंगाबादचे संभाजीनगर करणे, हा उद्धव साहेबांनी घेतलेला निर्णय आहे. संभाजीनगर हे होणारच आणि तातडीने होणार. किती जरी आडवे आलेना, तरी त्यांना आडवे करण्याची ताकद आम्ही ठेवणार, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसImtiaz Jalilइम्तियाज जलीलSanjay Shirsatसंजय शिरसाटShiv Senaशिवसेना