शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

राज्यातील २७ कारखान्यांनी दिली शंभर टक्के एफआरपी, १६६ कारखान्यांकडे थकबाकी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 2:08 AM

राज्यातील केवळ २७ साखर कारखान्यांनी उसाच्या रास्त आणि किफायतशीर दराची (एफआरपी) संपूर्ण रक्कम दिलेली आहे.

पुणे : राज्यातील केवळ २७ साखर कारखान्यांनी उसाच्या रास्त आणि किफायतशीर दराची (एफआरपी) संपूर्ण रक्कम दिलेली आहे. अजूनही १६६ साखर कारखान्यांकडे ४ हजार ९२६ कोटी १७ लाख रुपयांची थकबाकी असून, १४ हजार ८८१ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत, साखर आयुक्तालयाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ही माहिती समोरआली आहे.राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये साखरेला उठाव नसल्याने बहुतांश कारखान्यांकडे एफआरपी थकीत होती. साखरेचा उत्पादन खर्च आणि साखरेची किमान आधारभूत किंमत यामध्ये चारशे ते साडेचारशेंचा फरक असल्याचे साखर कारखान्यांचे म्हणणे होते. त्यामुळे साखरेचा किमान विक्री दर २९०० रुपये प्रतिक्विंटलवरुन ३५०० रुपये करावा अशी मागणी कारखान्यांनी केली होती. थकीत एफआरपीचा आकडा वाढल्याने, शेतकरी संघटनांनी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात साखर आयुक्तालयासमोर आंदोलन केले होते. अखेरीस केंद्र सरकारने साखरेचा किमान विक्री दर २९०० रुपयांवरुन ३१०० रुपये केला.यंदाच्या गाळप हंगामानुसार राज्यात १५ फेब्रुवारीच्या गाळपानुसार १२ हजार ९४९ कोटी रुपयांची एफआरपी दिली होती. तर, ४ हजार ८६४ कोटी रुपये थकीत होते. तर, १५ मार्चच्या अहवालानुसार राज्यात ८३९.६९ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. त्यानुसार एकूण एफआरपीची रक्कम १९ हजार ६२३ कोटी ४३ लाख रुपये होते. त्यातील १४ हजार ८८१ कोटी (७६ टक्के) रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून, ४ हजार ९२६ कोटी (२४ टक्के) रुपयांची रक्कम थकीत आहेत.करारानुसार शेतकऱ्यांना मिळणार ३१०० कोटीशुगर केन कंट्रोल आॅर्डर १९६६ नुसार एफआरपीसाठी राज्यातील २९ कारखान्यांनी शेतकºयांशी करार केले आहे. त्यानुसार शेतकºयांना ३१२७ कोटी ४० लाख रुपयांची रक्कम देण्यात येणार आहे. अनेक कारखान्यांनी ७५ टक्के रक्कम सुरुवातीस, तर उर्वरीत रक्कम बैलपोळा आणि दिवाळीला देण्याचा करार केला आहे.आणखी चार कारखान्यांवर आरआरसीची कारवाईवारंवार सांगूनही एफआरपीची रक्कम न देणाºया आणखी चार साखर कारखान्यांना साखर आयुक्तालयाने रेव्हेन्यू अ‍ॅण्ड रिकव्हरी सर्टीफिकेट (आरआरसी) बजावले आहे. त्यामुळे आरआरसी कारवाई केलेल्या कारखान्यांची संख्या ४९ झाली आहे. औरंगाबादचा घृष्णेश्वरकडे ३९.२५, सोलापूरच्या फॅबटेक ४६.०६, सांगलीच्या माणगंगाकडे ३.३६ आणि बीडच्या वैद्यनाथ कारखान्याकडे ३६.१० कोटी रुपयांची थकबाकी आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेMaharashtraमहाराष्ट्र