चांदूर रेल्वे (जि. अमरावती) : तालुक्यातील दानापूर या दोनशे लोकसंख्येच्या गावातील अनुसूचित जातीच्या सुमारे ५० व्यक्तींनी गावाबाहेर पाझर तलावाजवळ आंदोलन सुरू केले आहे. गावातील विशिष्ट जातीच्या लोकांनी जाणूनबुजून आपला पिढीजात वहिवाटीचा रस्ता बंद केला, अशी त्यांची तक्रार आहे. संबंधितांविरुद्ध ॲट्राॅसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करण्यात यावी, या मागणीसाठी त्यांनी आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे.रस्ता बंद केल्याने या लोकांची शेतीची सर्व कामे खोळंबली. त्यानंतर गावातील काही लोकांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली. याची तक्रार पोलिसात करण्यात आली.
रस्ता मिळण्यासाठी तक्रारीगावात कुठलाही जातीय वाद नाही. गावातील निवृत्त पोलीस अधिकारी हे शेतात जायला रस्ता पाहिजे, त्यासाठी गावातील लोकांची दिशाभूल करीत त्यांना भडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचाच भाग म्हणून आमच्यावर खोटे आरोप व पोलीस तक्रारी होत असल्याची प्रतिक्रिया राजेंद्र ढगे यांनी व्यक्त केली.