शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

उत्कृष्ट संसदपटू

By admin | Published: February 17, 2015 2:12 AM

आर. आर. आबा लाखांची सभाही सहज जिंकायचे. त्यांचे बोल अंत:करणातून यायचे. त्यामुळे आबा आपलेच दु:ख बोलून दाखवत आहेत असे वाटायचे. हेच त्यांच्या वक्तृत्वाचे रहस्य.

आर. आर. आबा लाखांची सभाही सहज जिंकायचे. त्यांचे बोल अंत:करणातून यायचे. त्यामुळे आबा आपलेच दु:ख बोलून दाखवत आहेत असे वाटायचे. हेच त्यांच्या वक्तृत्वाचे रहस्य. व्यवहारातील उदाहरणे, दाखले देऊन ते आपला मुद्दा लोकांच्या मनात पक्का बिंबवायचे. भाषणाच्या ओघात कोपरापासून ढोपरापर्यंत सारखे शब्दप्रयोग करत लोकांना तो मुद्दा उचलून धरण्यास भाग पाडायचे. ज्या विषयावर बोलायचे, त्यावर अपार कष्ट घेण्याची वृत्ती, टिपणे काढणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. प्रवासात ग्रंथांचे, वृत्तपत्रांचे वाचन अखंड सुरू असायचे. वृत्तपत्रांच्या कात्रणापासून विविध पुस्तकांचे संदर्भ त्यांना मुखोद्गत होते. विधिमंडळाच्या कामकाजासाठी तासन्तास ग्रंथालयामध्ये बसून अभ्यास, चिंतन, मनन करण्याचा आदर्शच आबांनी घालून दिला. त्याचाच परिपाक म्हणून राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या सदस्याला दिला जाणार ‘उत्कृष्ट संसदपटू’ हा पहिला पुरस्कार आबांनी १२ डिसेंबर १९९६ रोजी युती शासनाच्या काळात विरोधी पक्षाचे आमदार असताना मिळविला. तत्पूर्वी १९९० पासून ‘लक्षवेधीकार’ म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यांच्या विधिमंडळातील भाषणांवर पुस्तकेही निघाली. ६० वर्षे वयाच्या दारिद्र्यरेषेखालील शेतकऱ्यांना दरमहा ३०० रुपये निवृत्तीवेतन मिळण्यासाठी मांडल्या जाणाऱ्या पहिल्या अशासकीय ठरावाद्वारे शासनाला केलेल्या अनेक विधायक सूचनांमधून गाजविलेले ७ डिसेंबर १९९० रोजी केलेले पहिले भाषण आजही त्या क्षणाच्या साक्षीदारांना आठवत असेल. त्यासाठी नागपूरच्या ग्रंथालयात त्यांनी अभ्यास केला. २१ एप्रिल १९९३ रोजी पाटबंधारे खात्याच्या अनुदानावरील पूरक मागण्यांच्या चर्चेवेळी कृष्णा-गोदावरी पाणीप्रश्नी लवादानुसार महाराष्ट्राच्या वाट्याचे ९५० टीएमसी पाणी २००० पर्यंत न अडवल्यास आपली बांधिलकी सरकारबरोबर नसून दुष्काळग्रस्त जनतेबरोबर असेल असा सडेतोड इशारा त्यांनी दिला. युती शासनाच्या काळात तर ते जनसामान्यांच्या प्रश्नासाठी विधानसभेत अखंड धडाडणारी मुलूखमैदान तोफ ठरले. १९९९ मध्ये ग्रामविकास खात्याचे मंत्री झाल्यावर ७३ व्या व ७४ व्या घटना दुरूस्तीने पंचायत राज व्यवस्थेला संजीवनी देणारे ते ‘अंजनी पुत्र’ ठरले होते.