शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
4
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
5
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
6
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
7
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
8
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
9
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
11
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
13
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
14
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
16
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
17
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
18
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
19
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा

भर दुपारी फिल्मी स्टाईलने लुटले १५ लाख !

By admin | Published: July 14, 2016 8:49 PM

धुम स्टाईल ते दोघे सुसाट मोटारसायकवरून मिनी रिक्षाचा पाठलाग केला. रिक्षात बसलेल्या दोघांच्या डोळ्यात त्यांनी मिरचीपूड फेकली आणि बघता बघता १५ लाखाची रोकड घेऊन

ऑनलाइन लोकमतबीड, दि.१४ -  धुम स्टाईल ते दोघे सुसाट मोटारसायकवरून मिनी रिक्षाचा पाठलाग केला. रिक्षात बसलेल्या दोघांच्या डोळ्यात त्यांनी मिरचीपूड फेकली आणि बघता बघता १५ लाखाची रोकड घेऊन तितक्याच सुसाट वेगात ते दोघे निघूनही गेले. गेवराई तालुक्यात भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. बँकेची रक्कम घेऊन रिक्षातून जात असताना ही घटना घडली.शहरातील स्टेट बँक आॅफ हैद्राबादची एक शाखा धोंडराई येथे देखील आहे. या शाखेतील रोखपाल विकासकुमार गोपाल शर्मा, शिपाई दीपक आसाराम मुळुक हे दोघे गावातीलच खासगी मिनी प्रवाशी रिक्षातून (क्र. एमएच २३ जेडी २४७१) मधून गेवराईला आले होते. बँकेतून १५ लाख रुपयांची रोकड घेऊन लोखंडी पेटीत भरुन ते रिक्षातून धोंडराईला जात होते. धोंडराई फाट्यावरुन गाडी गावात जाण्यासाठी वळाल्यानंतर विना क्रमांकाच्या दुचाकीवरुन पाठमागून आलेल्या दोघांनी चालक किशोर भाऊसाहेब खरात (रा. धोंडराई) यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. त्यांनी गाडीचा वेग कमी करताच आत बसलेल्या इतर दोघांच्या दिशेनेही त्यांनी मिरची पूड फेकली; परंतु ती डोळ्यात गेली नाही. चालकाने गाडी रोखल्यावर दुचाकीवरील दोघेही खाली उरतले. त्यांनी ह्यपेटी माझ्याकडे देह्ण असे म्हणत कोयत्याचा धाक दाखवून धमकावले. त्यानंतर शिपाई मुळूक याने हात वर केले. त्याच्या दिशेने कोयत्याचा वार केल्यावर बोटाला किरकोळ जखम झाली. त्याने हात सोडताच चोरांनी पेटी घेऊन दुचाकीवरुन उमापूरच्या दिशेने पलायन केले. भयभीत अवस्थेत रोखपाल शर्मा यांनी गेवराई ठाण्यात कळविले. त्यानंतर निरीक्षक सुरेश बुधवंत फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करुन पोलिसांनी मिनी रिक्षा ताब्यात घेतला. दोन मिरचीपूडही आढळून आल्या. वाहनचालकासह तिघांकडे विचारपूस सुरु असून गेवराई ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.बँक अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणाधोंडराई येथील शाखेत गेवराई येथील बँकेतून आवश्यकता भासेल तशी रोकड नेली जात होती. त्यासाठी दोन वर्षांपासून गावातीलच किशोर खरात यांचा मिनी रिक्षा भाड्याने घेतला जात होता. हा रिक्षा सुरक्षेच्या दृष्टिने धोक्याचा आहे. शिवाय सुरक्षारक्षकाविनाच मोठ्या रकमेची ने- आण केली जायची. ते बँक अधिकाऱ्यांच्या अंगलट आले.तोंडाला रुमालदुचाकीवरुन आलेल्या दोघांनी आपल्या तोंडांवर रुमाल बांधला होता. त्यामुळे त्यांची ओळख पटविणे मुश्किल बनले आहे. बँक अधिकारी व चालकानेही त्यांचा चेहरा नीट पाहिलेला नाही. दहशत निर्माण करुन मिरची पूड व कोयत्याचा वापर करत रक्कम पळविणाऱ्या दोन चोरांनी पाळत ठेवून कृत्य केल्याचा पोलिसांना संशय आहे.