- अविनाश कोळीसांगली : जिवाला कवडीमोल ठरवत बेफिकिरीच्या वाटेने जाणाऱ्या लोकांच्या गर्दीत हेल्मट आणि सीटबेल्टविना महाराष्ट्रात दरवर्षी ७ हजारांवर लोक मृत्युमुखी पडत आहेत. देशातील एकूण अपघाती मृत्यूमध्ये सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे राज्यातील अपघातांची स्थिती गंभीर बनली आहे.महाराष्ट्र हायवे पोलिसांनी नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, २०१९ मध्ये राज्यातील हेल्मेट न घातल्यामुळे एकूण ५ हजार ३२८ लोकांचा जीव गेला. हेल्मेट नसल्याने गंभीर जखमी झालेल्या लोकांची संख्या ६ हजार ४२७ इतकी आहे. दरवर्षी अशा प्रकारच्या अपघातात बळींचे आणि गंभीर दुखापत होण्याचे प्रमाण अधिक आहे. २०१८ची तुलना करता हेल्मेटविना जीव गेलेल्यांची संख्या २०१९ मध्ये वाढली आहे. राज्यातील एकूण अपघाती मृत्यूचा विचार केल्यास जवळपास १० टक्के अपघात हे सुरक्षासाधनांचा वापर न केल्याने झाले आहेत. हेल्मेट न घातलेल्या चालकामुळे जवळपास १ हजार ६४६ सहप्रवाशांचा मृत्यू झाला, तर ३ हजार ६८२ चालक ठार झाले आहेत.सीटबेल्ट न घातलेले ८१९ चालक, तर ८७६ सहप्रवासी ठार झाले आहेत. म्हणजेच चारचाकी चालकांपेक्षाही त्यातील सहप्रवासी अधिक ठार झाल्याची बाब समोर आली आहे.सुरक्षासाधनांविना अपघाताचे तुलनात्मक आकडेहेल्मटविनावर्ष ठार गंभीर जखमी२०१८ ५२५२ ६४२६२०१९ ५३२८ ६४२७सीटबेल्टविनावर्ष ठार गंभीर जखमी२०१८ १६५६ २९२१२०१९ १६९७ २७२०हेल्मेट नसल्याने झालेले अपघात३६% ठार४४% गंभीर जखमी २०% किरकोळ जखमी
हेल्मेटअभावी महाराष्ट्रात गेले ५ हजारांवर बळी; सीटबेल्ट नसल्याने १,६९७ लोक ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 3:06 AM