प्रभू पुजारी, पंढरपूरसावळ्या विठूरायाच्या भेटीची आस मनी घेऊन कार्तिकी यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातून सुमारे चार लाखांपेक्षा अधिक भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. उद्या शुक्रवारी एकादशीचा मुख्य सोहळा असून विठूरायाचे दर्शन घेऊन हा सुखसोहळा डोळ्यात साठविण्यासाठी भाविक आतूर झाले आहेत़ महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा मध्यरात्रीनंतर तीन वाजता होणार होणार आहे. सध्या श्री विठ्ठलाची पदस्पर्श दर्शनरांग गोपाळपूर रस्त्यावरील मंदिर समितीच्या पत्रा शेडच्या पुढे तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या पत्राशेडपर्यंत गेली आहे. दर्शनासाठी भाविकांना सात ते आठ तास लागत आहेत.आषाढीनंतरची मोठी कार्तिकी वारी असते़ या वारीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्यासाठी एसटी, रेल्वे, खासगी वाहनांनी भाविक मोठ्या प्रमाणात पंढरीत दाखल होत आहेत. सध्या मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा वाळवंट, स्टेशन रस्ता, चौक ही ठिकाणे वारकऱ्यांनी गजबजली आहेत. संत गजानन महाराज मठ, संत तनपुरे महाराज मठ, संत कैकाडी महाराज मठ यासह अन्य मठातही भाविकांची वर्दळ आहे़ मठ, धर्मशाळा, आश्रमशाळेत भजन, प्रवचन, किर्तनाचे सूर आळवले जात आहेत़ पंढरपुरात येणारा भाविक चंद्रभागा नदीत स्नान करून विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी दर्शनरांगेकडे जात आहेत. दर्शनरांग गोपाळपूर रस्त्यावरील पत्राशेडपर्यंत गेली असून, पदस्पर्श दर्शनासाठी सात ते आठ तास लागत आहेत. दर्शन रांगेतील भाविकांसाठी मंदिर समिती आणि स्वयंसेवी संस्थेतर्फे मोफत चहा, पाण्याची सोयदर्शन रांगेत होणारी घुसखोरी, चोरी रोखण्यासाठी २४ तास चोख पोलीस बंदोबस्तमंदिर समितीतर्फे ९० सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून संपूर्ण वारीवर नजरनामदेव पायरी येथे एलईडी स्क्रीनद्वारे थेट दर्शनमंदिर समितीच्या वतीनेलॉकरची सोय६५ एकर क्षेत्रांवर वारकऱ्यांसाठी पाणी, वीज, रस्ते, औषधोपचार, स्वच्छतागृहांची सोयवाखरी तळ येथे जनावरांच्या बाजाराची सोय
पंढरपुरात चार लाखांच्या वर भाविक
By admin | Published: November 11, 2016 6:00 AM