इंदापूर : गुरुवारी रात्री इंदापूर तालुक्यात सर्वदूर धुवांधार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. निमगाव केतकी, काटा, बावडा, सणसर, भिगवण, तसेच बारामती तालुक्यातील काटेवाडी, पिंपळी, सोनगाव या परिसरांमध्ये पावसाचा जोर जास्त होता. या पावसामुळे शेतातील पीक पेरणीच्या कामांना चांगला फायदा होणार आहे.विशेषत: गुरुवारी रात्री तालुक्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गुरुवारी सकाळ पासूनच आभाळ भरून आले आहे. त्यामुळे शुक्रवारीही चांगला पाऊस येण्याची शक्यता आहे. सर्वाधिक पाऊस बावड्यात ७८ मिमी, इंदापूर शहर ७७ मिमी झाला. काटी ५७ मिमी, अंथुर्णे ५५ मिमी, निमगाव केतकी ४५ मिमी, सणसर ४४ मिमी, लोणी देवकर ४० मिमी, भिगवण ३४ मिमी अशी इतर ठिकाणी झालेल्या पावसाची आकडेवारी आहे.>रात्री ११ वाजता पावसाला सुरुवात झाली. सुमारे तासभर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर सकाळी साडेपाच वाजेपर्यंत रिमझीम सुरूच होती. अनेक ठिकाणी रानात पाणी साठले होते. ओसांडून वाहत होते. शहरात ठिकठिकाणी पाणी साठले. भार्गवराम तलावातील बागेत पाणी साचले होते. जवळच असणाऱ्या मालोजीराजेंच्या समाधीच्या नियोजित बांधकामाच्या पायथ्याशी जागेत तळेच निर्माण झाले आहे.
इंदापूरमध्ये सर्वदूर पाऊस
By admin | Published: June 11, 2016 12:46 AM