शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
3
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
4
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
5
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
6
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
7
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
8
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
9
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
10
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
11
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
12
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
13
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
14
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
15
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
16
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
17
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
18
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
19
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
20
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."

प्रतापगडावरील अनधिकृत बांधकामावर रातोरात सर्जिकल स्ट्राइक; देवेंद्र फडणवीस म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 1:24 PM

१४४ कलम लागू केल्यामुळे कोणीही किल्ले प्रतापगडच्या परिसरात फिरल्यास त्यावर कडक कारवाई केली जात असल्याने परिसरात तणापूर्ण वातावरण निर्माण झाले.

मुंबई - गेल्या अनेक वर्षापासून सातारा प्रतापगडावरील अफजल खानच्या थडग्याशेजारील अनधिकृत बांधकामावर प्रशासनाकडून हातोडा पडला आहे. पोलीस प्रशासनाने या परिसरात कलम १४४ लागू करून कठोर बंदोबस्त लावला होता. ४ जिल्ह्यातील १५०० पोलीस या परिसरात तैनात करण्यात आले. त्यानंतर प्रशासनाने अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे. 

या कारवाईवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजचा दिवस आपल्यासाठी अभिमानाचा आहे. आजच्या दिवशी अफजल खानाचा वध झाला होता. २००७ साली कोर्टानं या अफजल खानच्या थडग्याजवळ असलेले अनधिकृत बांधकाम काढले पाहिजे अशी नोटीस दिली होती. २०१७ मध्ये आम्ही कारवाई सुरू केली होती. परंतु त्यात पुन्हा कायदेशीर अडचणी आल्या. आता या सर्व अडचणी दूर झाल्या असून सातत्याने शिवप्रेमींची मागणी होते त्याठिकाणचं बांधकाम तोडावं. शिवप्रेमींवर गुन्हे दाखल झाले परंतु अतिक्रमण हटवलं नव्हतं. आज सगळ्यांसाठी समाधानाची गोष्ट आहे कारण त्याठिकाणचं सगळं अतिक्रमण हटवण्यात आले असं त्यांनी सांगितले. 

रातोरात हटवलं अतिक्रमणप्रतापगड परिसरात असलेल्या अफजल खानच्या थडग्याजवळचं अनधिकृत बांधकाम पोलीस बंदोबस्तात रातोरात हटवण्यात आलं आहे. अतिक्रमण पाडण्यासाठी बुधवारी रात्रीपासूनच जोरदार तयारी सुरू झाली होती. शिंदे फडणवीस सरकारचा हा सर्जिकल स्ट्राइक मानला जात आहे. शिवप्रताप दिनी अवतीभोवती अनेक हजारोंच्या संख्येने शिवभक्त महाबळेश्वर तालुकामध्ये दाखल झाले होते. मात्र पोलिसांनी कोणासही प्रतापगड किल्ल्याच्या परिसरात फिरण्यास मनाई केली आहे.

१४४ कलम लागू केल्यामुळे कोणीही किल्ले प्रतापगडच्या परिसरात फिरल्यास त्यावर कडक कारवाई केली जात असल्याने परिसरात तणापूर्ण वातावरण निर्माण झाले. किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खान कबरीच्या जवळील बांधकाम बुधवारी रात्रीपासून पाडण्यास सुरू केल्याने प्रशासनाकडून मोठी खबरदारी घेण्यात आली. जिल्ह्यात अनुचित प्रकार घडून येत म्हणून जिल्ह्यातील सर्वच प्रार्थना स्थळ पोलीस बंदोबस्त दिला आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रतापगड परिसरात जमावबंदी १४४ कलम लागू करण्यात आले आहे. तसेच  जिल्ह्यातील मंदिरे, मस्जिद परिसरात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस