वाशिम : सातत्याने प्रवासी संख्येत होत असलेली घट आणि आर्थिक तुट भरून काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग परिवहन महामंडळाने राज्यात युद्धपातळीवर 'प्रवासी वाढवा विशेष अभियान' राबविण्याचा निर्णय घेतला असून, १ ऑगस्टपासून या अभियानाच्या अंमलबजावणीला सुरूवात होणार आहे.सदर प्रवासी वाढवा अभियान ३0 सप्टेम्बरपर्यंत चालणार असून त्या अंतर्गत एसटी सेवेचा दर्जा व उत्पन्न वाढविण्यासाठी कर्मचार्यांना प्रोत्साहन आणि प्रवाशांना एसटीकडे आकृष्ट करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. दरम्यान, अभियानाच्या कालावधीत प्रत्येक महिन्यात प्रदेशांतर्गत उत्कृष्ट काम करणार्या प्रथम क्रमांकाच्या आगारास १ लाख रूपये, द्वितीय क्रमांकाच्या आगारास ७५ हजार रूपये तर तृतीय क्रमांकास ५0 हजार रूपयाचे बक्षीस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या व्यतिरिक्त सर्वोत्कृष्ट कामगिरी करणार्या विभागास ५0 हजार रूपये रोख व प्रशस्तीपत्र तथा जास्तीतजास्त प्रवाशांची वाहतूक करणार्या प्रत्येक आगारातील एका वाहकाला ५ हजार रूपये रोख व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या अभियानामुळे प्रवासी संख्येत वाढ होण्याची अपेक्षा आहे.
एसटी राज्यात राबविणार ‘प्रवासी वाढवा अभियान’
By admin | Published: July 24, 2014 11:02 PM