शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

आरएसएसचे समांतर शासन उलथून टाका- प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 5:39 AM

संविधान टिकवण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन; पिंपरीत वंचित बहुजन आघाडीचा मेळावा

पिंपरी : भाजपाच्या आडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशात समांतर सरकार चालवत आहे. हे समांतर सरकार रोखण्यासाठी काँग्रेस पाऊल टाकत नाही, त्यामुळे काँग्रेसबरोबरचा समझोता फिस्कटला असे सांगून देशाचे संविधान कायम टिकविण्यासाठी समांतर शासन उलथून टाकण्याचा चंग बांधला आहे. अशी भूमिका बहुजन वंचित आघाडीचे नेते, भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.पिंपरीतील एच ए मैदानावर सोमवारी वंचित बहुजन आघाडीचे महाअधिवेशन झाले. यावेळी आंबेडकर बोलत होते. आमदार इम्तीयाज जलील, माजी आमदार लक्ष्मण माने, भारिपचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, अशोक सोनोने, नाथन केंगार, नवनाथ पडळकर आदी उपस्थित होते. आंबेडकर म्हणाले, मुस्लिम समाजाच्या व्यकतीकडे हत्यारे आढळून आली, तर त्यास दहशतवादी ठरवले जाते. अदिवासींकडे असे काही आढळून आले तर त्यांना नक्षलवादी ठरविण्यात येते. आरएसएस तसेच सनातन संस्थेच्या सदस्यांकडे हत्यारे आढळून आल्यानंतर त्याबद्दल काहीच म्हटले जात नाही. वेगवेगळे मापदंड वापरले जात आहेत.भाजपाच्याआडून आरएसएस, सनातन या संस्थां वेगळी समांतर व्यवस्था उभी करीत आहेत. राज्यघटना बदलण्याचे प्रयत्न होत आहे. ही समांतर व्यवस्था उलथून टाकण्यासाठी काँग्रेसने धोरण स्पष्ट करावे, असे सुचविले. भारिप बहुजन महासंघाने एमआयएमबरोबर जाण्याबाबत काँग्रेसचा आक्षेप होता, समांतर व्यवस्थेच्या विरोधात जाण्यास काँग्रेस तयार नाही. त्यामुळे आम्ही वंचित घटकांना बरोबर घेऊन जाण्याची दिशा निश्चित केली.आरक्षणाने समाजात मनभेद ...एखाद्या समाजाला खूश करण्यासाठी आरक्षणाची खिरापत वाटली जात आहे. आरक्षणाने विद्रोह शमणार नाही. आरक्षणामुळे आपापसात स्पर्धा निर्माण होऊन मनभेद होणार आहेत. गेल्या अनेक वर्षापासून विशिष्ट घरण्यांची सत्ता पहावयास मिळत आहे. मराठा समाजाला सत्तेवर संधी मिळाली, असे नव्हे तर मराठी समाजातील काही कुटूंबांनी सत्ता उपभोगली आहे. लोकशाहीत कुटुंबशाही नको, नात्यागोत्याची सत्ता आता पुरे झाली. व्देषाचे राजकारण न करता, वंचित घटकाच्या विकासाचे, सर्वसमावेशक विकासाचे राजकारण होणेगरजेचे आहे.सरकारची धोरणे चुकीची...शिक्षणाचा खर्च सरकारने करणे अपेक्षित आहे. आपल्या येथे बँकेचे कर्ज घेऊन कुटुंबीय मुलांना शिक्षण देतात. हा खर्च कुटूंबाने केला असल्याने, तो खर्च वसूल करण्याची त्यांची मानसिकता असते. कर्ज काढून शिक्षण घेऊन डॉक्टर झालेले, अभियंता झालेले तरूण मानवतेच्यादृष्टीने विचार करीत नाही. सरकारच्या अशा चुकीच्या धोरणामुळे मानवतेचा बळी घेणारे लुटारू तयार होत आहेत. औरंगाबादचे एमआयमचे आमदार इम्तियाज जलील म्हणाले, अ‍ॅड प्रकाश आंबेडकर यांना आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपात पाहतो.वंचित बहुजन आघाडी स्थापण्यामागे केवळ सत्ता मिळविणे हा उद्देश नाही, तर देशाच्या संविधानाचे रक्षण करणे हा मुख्य हेतू आहे. दरम्यान मार्गदर्शक तत्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे आगामी काळात वंचित बहुजन आघाडी सत्तेवर आल्यास राज्य घटनेतील मार्गदर्शक तत्वांचे रूपांतर मुलभूत अधिकारांमध्ये करण्यात येईल.असा ठराव पिंपरी येथे झालेल्या अधिवेशनात संमत करण्यात आला.कुपोषणाची आकडेवारी पुढे येत नाहीपुणे जिल्हा हा सत्तेचे माहेरघर मानला जातो. जाणता राजाचे वास्तव्य असलेला हा जिल्हा आहे. मावळ आणि आंबेगाव भागात आदिवासींचे वास्तव्य आहे. नंदूरबार, मेळघाट, गडचिरोली येथील आदिवासी बालकांच्या कुपोषणाची आकडेवारी जाहीर केली जाते. परंतू जाणता राजा असलेल्या भागातील आदिवासींच्या कुपोषणाची आकडेवारी कधी पुढे येऊ दिली जात नाही. जाणत्या राजाला कुपोषणाची जाणीव नाही. अशी टिप्पणी अ‍ॅड प्रकाश आंबेडकर यांनी माजी केंद्रिय मंत्री शरद पवार यांचे नाव न घेता केली. तसेच, एचएची जागा लाटण्याचा राष्ट्रवादी नेत्यांचा डाव होता, त्यामुळेच ‘एचए’चे पुनरूज्जीवन अद्याप होऊ शकले नाही. असा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपाBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघ