मुंबई : महाराष्ट्र आणि गोव्यातील क्रमांक १ चे दैनिक असलेल्या ‘लोकमत’तर्फे आयोजित चौथ्या ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार’ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आॅनलाइन प्रवेशिका भरण्याची शुक्रवार १७ मार्च ही अंतिम मुदत आहे. वैयक्तिक माहितीसह झोन निवडून ‘क्लासिकल’ अथवा ‘पॉप्युलर’पैकी एक प्रकार निश्चित करून स्पर्धकांना आपल्या प्रवेशिका सायंकाळपर्यत अपलोड करता येतील. स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला असून महाराष्ट्रभरातून दोन हजारांवर कलाकारांनी वेबसाइटवर नोंदणी करून प्रवेशिका पाठविल्या आहेत. कैलाश खेर विशेष आकर्षणनागपुरात २५ मार्च रोजी आयोजित एका विशेष कार्यक्रमात या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते एक लक्ष रुपये सन्मान निधी, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे ख्यातनाम गायक कैलाश खेर यांची उपस्थिती. ते तब्बल दोन तास गीतांचा कार्यक्रम सादर करतील. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यावेळी काही गाणी सादर करतील.कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘सपट परिवारा’च्या वतीने ‘सपट बँड’च्या सादरीकरणाचा रसिकांना आस्वाद घेता येईल. या पुरस्काराच्या माध्यमातून लोकमत संगीत क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मानासोबतच या क्षेत्रातील नवोदितांना हक्काचे व्यासपीठ प्रदान करीत असतो. यंदा या पुरस्काराचे हे चौथे वर्ष आहे. (प्रतिनिधी)आॅनलाइन प्रवेशिका पाठविण्याची पद्धतजास्तीत जास्त पाच मिनिटे कालावधीची आपली प्रवेशिका आॅडिओ अथवा व्हिडिओ या कोणत्याही एका माध्यमात तयार करा. प्रवेशिका आॅनलाइन अपलोड करण्यासाठीwww.surjyotsna.org या संकेतस्थळास भेट द्या. ‘सूर ज्योत्स्ना’ पुरस्कारासंबंधीची सर्व माहिती व्यवस्थित वाचा. प्रवेशिका अपलोड करण्यासाठी ‘सबमिट’वर क्लिक करा. वैयक्तिक माहितीसह झोन निवडून ‘क्लासिकल’ अथवा ‘पॉप्युलर’पैकी एक प्रकार निश्चित करून आपली प्रवेशिका अपलोड करा. नियम व अटी चौकटीत क्लिक करा आणि सबमिट बटण दाबा. प्रवेशिका अपलोड करण्याची अंतिम मुदत १७ मार्च २०१७ अशी आहे. असे आहे स्पर्धेचे स्वरूप१ - ही स्पर्धा १५ ते ३० वयोगटातील स्पर्धकांसाठी आहे.२ - अंतिम फेरीतील स्पर्धकांना नागपुरात २५ मार्च रोजी होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळयात ‘लाइव्ह परफॉरमन्स’ची संधी दिली जाईल.
राज्यभरातील कलाकारांचा भरघोस प्रतिसाद
By admin | Published: March 17, 2017 3:25 AM