ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - मुंबई महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाने घाटकोपर पूर्वच्या प्रभाग क्र. 132मधून पराग शाह यांना उमेदवारी दिली आहे. पराग महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात श्रीमंत उमेदवार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 690 कोटींपेक्षाही जास्त संपत्तीचे ते मालक आहेत. त्यांनी स्वतः निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली आहे.
47 वर्षांचे पराग शाह हे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचे निकटवर्तीय मानले जातात. बांधकाम व्यावसायिक असलेल्या पराग यांचा व्यवसाय मुंबईसह गुजरात आणि चेन्नईतही आहे.
भाजपाने त्यांना कॉंग्रेसचे प्रविण छेडा आणि शिवसेनेच्या सुधाकर पाटील यांच्याविरोधात उमेदवारी दिली आहे. राजकारणात ते नवखे आहेत. यापुर्वी 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही श्रीमंत उमेदवारांच्या यादीत भाजपाच्याच मोहित कंबोज यांनी अव्वल क्रमांक पटकावला होता . त्यांनी 353.53 कोटींची संपत्ती घोषीत केली होती.