भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या 67 वर्षांच्या होत्या. मोदी सरकारच्या दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार दिला होता. एम्सच्या डॉक्टरांनी काल रात्री निधन झाल्याचे सांगितले.
स्वराज यांचा मृतदेह अंत्य दर्शनासाठी बुधवारी सकाळी भाजपा मुख्यालयामध्ये ठेवण्यात आला होता. यावेळी एमडीएचचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांनीही स्वराज यांचे अंत्यदर्शन घेतले आणि श्रद्धांजली वाहिली. मात्र गुलाटी भावूक झाले.