शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

राज्यात थंडीने केले ‘पॅकअप’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 5:35 AM

हवामान खात्याची घोषणा : येत्या चार दिवसांत कमाल तापमान वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईसह राज्याला हुडहुडी भरविणाऱ्या थंडीने रविवारी पॅकअप म्हणजेच माघार घेतली आहे. तशी घोषणाच भारतीय हवामान शास्त्र विभागाने केली असून, पुढील चार दिवस राज्यांत कमाल तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. १० आणि ११ फेब्रुवारी रोजी समुद्रकिनारी ३० ते ३२ तर राज्यभरात कमाल तापमान २८ ते ३० अंश नोंदविण्यात येईल. १२ फेब्रुवारी रोजी समुद्रकिनारी कमाल तापमान ३० ते ३२ अंश, तर १३ फेब्रुवारी रोजी कोकणात कमाल तापमान ३२ ते ३४ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येईल.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागांत किमान तापमानात किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलेनत उल्लेखनीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या उर्वरित भागात किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.मुंबईची हवा बिघडणारमुंबईत उबदार दिवस व सुखद रात्रीसह हवामान कोरडे राहील. हवेची गुणवत्ता मध्यम व खराब वर्गात राहण्याची शक्यता आहे. दिवसाचे तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान स्थिरावण्याची शक्यता असून, तर किमान तापमान २० अंशांपेक्षा जास्त राहील.

स्कायमेट काय म्हणते?चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, सांगली आणि सोलापूर येथे येत्या २४ तासांत हलक्या पावसाचीशक्यता आहे.मराठवाडा आणि लगतच्या दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या आसपासच्या भागात पुढील २४ तासांत हलक्या सरी आणि गडगडाटी परिस्थिती निर्माण होईल.विदर्भातील दक्षिणेकडील भागातही पुढील २४ तासांत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, लातूर, बीड, सांगली, सोलापूर इत्यादी ठिकाणी हलका पाऊस होईल.

टॅग्स :Winter Care Tipsथंडीत त्वचेची काळजी