शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
3
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
4
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
5
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
6
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
7
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
8
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
9
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
10
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
11
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
12
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
13
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
14
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
15
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
16
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
17
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
18
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
19
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
20
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

मेहनत, वेळेचे नियोजन करून फायदेशीर भातशेती

By admin | Published: July 13, 2017 3:33 AM

भातशेतीच्या पिकापेक्षा मजुरीवर खर्च अधिक होतो.

सिकंदर अनवारे । लोकमत न्यूज नेटवर्कदासगाव : भातशेतीच्या पिकापेक्षा मजुरीवर खर्च अधिक होतो. उत्पन्न, खर्च आणि मेहनत याचा ताळमेळ जुळत नाही. अशी अनेक कारणे पुढे करत कोकणातील शेतकरी शेतीपासून दूर जात आहेत. वेळेचे नियोजन आणि अंगमेहनत यांचा ताळमेळ साधला तर शेती फायदेशीर ठरू शकते हे महाड तालुक्यातील गोंडाले गावातील समीर तळेकर या तरुण शेतकऱ्याने सिद्ध केले आहे. गेली पाच ते सात वर्षे समीर आणि त्याचे वडील आपला व्यवसाय सांभाळून उरलेल्या वेळेत तीन खंडी भाताची शेती करीत आहेत. कोकणामध्ये छोट्या छोट्या तुकड्यामध्ये भात शेती केली जाते. निसर्गाच्या लहरीपणावर ही भात शेती अवलंबून असून, मजुरीचा दर वाढल्याने शेतीमधील फायदा कमी झाला आहे. नांगरणी, लावणी, कापणी आणि झोडणी या चार भात शेतीमधल्या मोठ्या आणि अंगमेहनतीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागत असून गरजेप्रमाणे मजूर मिळत नसल्याने कोकणातील शेतकरी हवालदिल झाला आहे. पारंपरिक पद्धतीप्रमाणे शेती करत असताना शेतीच्या उत्पन्नापेक्षा खर्च अधिक येतो तर कोणतेही अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले तरी शेतीतून मिळणाऱ्या नफ्यात मोठा फरक पडत नाही. त्यातच निसर्गाने फटका दिल्यास हाता-तोंडाशी आलेले भात पीक जमीनदोस्त होण्याची भीती असल्याने शेतकरी भातशेतीपासून दूर चालला आहे. घरामध्ये आई-वडील, मुलगा आणि सून असे चौघांचेच कुटुंब असणाऱ्या समीर तळेकर या तरुण शेतकऱ्याने वेळेचे आणि श्रमाचे नियोजन करून शेती करून दाखवली आहे.महाड शहरापासून दोन ते तीन किमी अंतरावरती गोंडाळे हे छोटेसे गाव आहे. या गावातील झांझे कोंड येथे समीर तळेकर हा तरुण शेतकरी राहतो. महाडमध्ये खासगी शाळेत स्कूल व्हॅनद्वारे मुलांची वाहतूक करणे, रिक्षा चालविणे हा त्याचा पूर्णवेळ व्यवसाय असून त्याचे वडील सुरेश तळेकर हे गोंडाळे गावचे पोस्टमन आहेत. आपले नियमित काम करून तळेकर पिता-पुत्र फायद्याची शेती करतात. नांगरणीवरचा खर्च कमीभात शेती करताना किमान वेगवेगळ्या कामासाठी चार वेळा शेतामध्ये नांगर फिरवला जातो. स्वत:चा नांगर आणि बैलजोडी असली तरी नांगराचा एवढा वापर शेतकऱ्याला परवडणारा नसतो. या अनावश्यक खर्चाचा विचार करून केवळ एकदाच नांगरणी करून तळेकर कुटुंबीय भात शेती करत आहे. सुरुवातीला एकदाच शेतात ट्रॅक्टरद्वारे नांगरणी केली जाते. नंतर चांगल्या पावसाने शेतात अपेक्षित चिखल झाल्यानंतर थेट लावणीचे काम सुरू केले जाते. लावणी करताना पुन्हा शेतात नांगर न फिरवता गरज भासेल तिथे कुदळीने जमीन नरम करत भात शेतीची लावणी केली जाते. पारंपरिक पद्धतीपेक्षाही थोडी वेगळी पद्धत असली तरी यामुळे भात शेतीच्या उत्पन्नात घट होत नसून उलट मेहनत, वेळ, पैसा या तिन्ही गोष्टी वाचल्या आहेत.भात कापणीनंतर मटकीची शेतीभात शेती करत असताना मेहनत आणि वेळेची काटकसर करत ओल्या जमिनीत मटकीचे बियाणे टाकून केवळ खुरपणी आणि झोडणी ही दोनच कामे करून हे कुटुंब मटकीचे पीक देखील चांगल्या प्रकारे घेत आहेत. मटकीला चांगला दर आणि मागणी मिळते तर कमी देखभालीमध्ये पीक चांगले येते. याचा फायदेशीर विचार या ठिकाणी कुटुंबीयांनी केला आहे. वर्षाकाठी ५० किलोपर्यंत मटकीचे उत्पन्न तळेकर कुटुंबीय घेत आहे.शेतीसाठी शेणखताचा वापरचांगले पीक येण्यासाठी जवळजवळ सर्वच शेतकरी रासायनिक खताचा वापर करतात. शासन सेंद्रिय खतांचा आग्रह करीत असले तरी याबाबत शेतकऱ्यांमध्ये म्हणावी तितकी जनजागृती झालेली नाही. तळेकर कुटुंबीय आपली ही शेती करत असताना रासायनिक खतांऐवजी शेणखताचा वापर करीत शेती करीत आहे. मटकीची शेती झाल्यानंतर उरलेली गुली ज्या शेतकऱ्याला ते देतात त्याच्याकडून पैशाऐवजी शेण तळेकर घेतात आणि या शेणाचा शेतात वापर शेणखत म्हणून केला जातो.मजुराशिवाय पिता-पुत्राने के ले कामतळेकर पिता-पुत्राचे काम सकाळी ७.३० वाजल्यापासून सुरू होते, ते तर संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुटी होते. हे पिता-पुत्र संध्याकाळच्या वेळेचे नियोजन करत रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत शेतात मेहनत करतात. तरवा भाजणीपासून ते भात झोडणीपर्यंतची सर्व कामे ते संध्याकाळी ४ ते रात्री ९ या वेळेत करतात. या सर्व कामासाठी एकही विकतचा मजूर ते घेत नाहीत. कामाचे दिवस वाढत असतानाच अंगमेहनत देखील वाचते, मात्र मजुरीवरील खर्च कमी होत असल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत आणि मजुरांच्या नियोजनासाठी त्याच्या मागे फिरतात. वाया जाणारा वेळ ते वाचवतात. मजूर न लावता हे पिता-पुत्र परिश्रम घेत असल्याने मजुरांवर होणाऱ्या मोठ्या खचाची यामुळे बचत होते. तसेच रसायनविरहीत शेती करत असल्यामुळे खत आणि किडनाशकांवरील खर्चाची बचत होती. के वळ शेणखताचा उपयोग के ल्याने जमिनीचे देखिल नुकसान न होता आरोग्यासाठी चांगले अन्नधान्या हे पीता-पुत्र पीकवत आहेत. अनेक खर्चांना फाटा देत असल्याने त्यांची शेती फायद्यात आहे.>सर्वच शेतकरी मजुरांची कमतरता आणि शेतीतून मिळणारा कमी नफा याची ओरड करतात तर अनेक शेतकरी शेतीच्या कामासाठी महिनाभरासाठी आपल्या कामावर सुट्या टाकतात. या खर्चीकपणातून मार्ग काढण्यासाठी शेती करण्याचा हा मार्ग आम्ही अवलंबला आहे. शेती करत असताना आपली रोजची कामे कुठेही खंडित न करता रिकाम्या वेळेचे नियोजन करून आम्ही शेती करतो हे करत असताना अंगमेहनत होत असली तरी शेतीचे उत्पन्न आणि फायदा वाढत आहे. त्यामुळे अंगमेहनतीचा त्रास होत नाही तर शेती करण्यासाठी जोम अगर प्रोत्साहन मिळते. - समीर तळेकर, तरुण शेतकरी, गोंडाळे