Maharashtra Election 2019 : पडळकरांची लढत अजित पवारांशी; मात्र संघर्ष जानकरांच्या कार्यकर्त्यांशी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 05:45 AM2019-10-17T05:45:58+5:302019-10-17T05:57:22+5:30

बारामतीमध्ये आजपर्यंतच्या निवडणुकांचा आढाव घेतल्यास पवारविरोधकांना ६०-६५ हजार मतांपेक्षा जास्त मते मिळालेली नाहीत.

Padlakar fight with Ajit Pawar, But the struggle with mahadev jankar activists | Maharashtra Election 2019 : पडळकरांची लढत अजित पवारांशी; मात्र संघर्ष जानकरांच्या कार्यकर्त्यांशी

Maharashtra Election 2019 : पडळकरांची लढत अजित पवारांशी; मात्र संघर्ष जानकरांच्या कार्यकर्त्यांशी

googlenewsNext


अविनाश थोरात।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बारामती विधानसभा मतदारसंघात राष्टÑवादी कॉँगे्रसचे नेते अजित पवार यांना रोखण्यासाठी भारतीय जनता पक्षाने रणनीती आखली. सामाजिक समीकरण साधण्यासाठी फायरब्रँड नेते गोपीचंद पडळकर यांना भाजपकडून उभे केले; मात्र अजित पवारांशी सामना असताना पडळकर आणि राष्टÑीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्यातच संघर्ष असल्याचे चित्र आहे.


बारामतीमध्ये आजपर्यंतच्या निवडणुकांचा आढाव घेतल्यास पवारविरोधकांना ६०-६५ हजार मतांपेक्षा जास्त मते मिळालेली नाहीत. चंद्रराव तावरे यांच्यापासून बाळासाहेब गावडेंपर्यंत अनेक प्रयोग भाजपने केले. विरोधी पक्षांचा एकत्रित उमेदवार देऊनही फायदा झाला नाही. त्यामुळे या वेळी गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी देण्यात आली.
धनगर समाजाला दिलेल्या सवलती, आरक्षणासाठी प्रयत्न, असे त्यांचे प्रचाराचे मुद्दे आहेत; मात्र राज्यात जानकर यांच्याशी भाजपचे संबंध बिघडल्याने रासपला मानणाऱ्या कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचणे पडळकरांसाठी आवश्यक झाले आहे. या कार्यकर्त्यांसाठी माजी सभापती आणि वंचित बहुजन आघाडीचे अविनाश गोफणे यांचाही पर्याय असल्याचे बोलले जात आहे.


जमेच्या बाजू
ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार यांनी गेल्या अनेक वर्षांपासून मतदारसंघाची बांधणी केली आहे. मतदारसंघात सहकारी संस्थांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. राष्टÑवादी कॉँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. बारामती मतदारसंघात विकासाच्या मुद्द्यावर विरोधकांना बोलण्यासारखे फार नाही. दर वेळी विरोधकांकडून नवा चेहरा देण्याचा प्रयोग करण्यात येत असल्याने प्रबळ विरोधक तयार झालेला नाही.
सामाजिक समीकरण साधण्याचा प्रयत्न होत आहे. फर्डे वक्ते म्हणून प्रसिद्ध असल्याने सभांना प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यातील जिरायती भागातील पाण्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी आश्वासने दिली आहेत. माळेगाव सहकारी साखर कारखाना पवारविरोधक असलेल्या चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांच्याकडे असल्याने त्यांच्याकडून मदत. भाजपचे बाळासाहेब गावडे, दिलीप खैरे, प्रशांत सातव यांच्याकडून एकत्रित प्रचार होत आहे.


उणे बाजू
बारामती तालुक्यातील जिरायती आणि बागायती भागातील विषमता असल्याचा मुद्दा विरोधकांकडून करण्यात येतो. जिरायती भागातील पाण्याचा प्रश्न मोठा आहे. विरोधकांच्या ताब्यात असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याने उसाला चांगला भाव दिला आहे. हा मुद्दा विरोधकांकडून मांडला जात आहे. राज्यातील वातावरणामुळे सर्व विरोधक एकवटले आहेत. एकत्रितपणे प्रचार करत असल्याचे चित्र आहे.
ऐन वेळी उमेदवारी जाहीर झाल्याने निवडणुकीच्या तयारीला वेळ मिळाला नाही. स्थानिक उमेदवार नसल्याने गावपातळीपर्यंतच्या कार्यकर्त्यांशी संपर्क नाही. महादेव जानकर यांचा राष्टÑीय समाज पक्ष अद्याप सोबत नसल्याने सामाजिक समीकरण साधण्याच्या रणनीतीत अडचणी आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अविनाश गोफणे यांच्यामुळे होणाºया मतविभाजनाचा फटका बसू शकतो. नेत्यांकडून केवळ तोंडदेखला प्रचार होऊ शकतो.

Web Title: Padlakar fight with Ajit Pawar, But the struggle with mahadev jankar activists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.