नवी दिल्ली - देशात गुरुवारी म्हणजे २६ जानेवारी रोजी ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. देशातील एकूण १०६ नागरिकांना यंदाच्या वर्षी पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. त्यामध्ये, ६ पद्मविभूषण, ९ पद्मभूषण आणि ९१ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. तर, १९ महिलांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. ओआरएसचे निर्माता दिलीप महालनोबिस यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं असून महाराष्ट्रातील झाकीर हुसेन यांनाही पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
महाराष्ट्रातील १२ व्यक्तींना यंदा पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. त्यामध्ये, एक पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ८ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. झाकीर हुसेन यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात येत आहे. पद्मभूषण पुरस्कारासाठी तीन सुमन कल्याणकर, दिपक धर आणि उद्योजक कुमार मंगलम बिर्ला यांची नावे जाहीर झाली आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच निधन झालेले उद्योजक आणि शेअर मार्केटचे बिग बुल म्हणून ओळख असलेल्या दिवंगत राकेश झुनझुनवाला यांनाही मरणोत्तर पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.
पद्म पुरस्कार विजेत महाराष्ट्रीय
पद्मविभूषण झाकीर हुसेन
पद्मभूषण सुमन कल्याणपूरपद्मभूषण दिपक धरपद्मभूषण कुमार मंगलम बिर्ला
पद्मश्री प्रभाकर मांडेपद्मश्री रमेश पतंगेपद्मश्री भूिकू रामजी इदातेपद्मश्री परशुराम खुणेपद्मश्री गजानन मानेपद्मश्री राकेश झुनझुनवाला
पद्मश्री कुमी नरीमन वाडिया
पद्मश्री रविना टंडन