यंदाच्या पद्म पुरस्कारांच्या यादीत महाराष्ट्रातील दोन लोकप्रिय व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये अशोक मामा म्हणून उभ्या महाराष्ट्राला परिचित असणाऱ्या मराठी चित्रपट सृष्टीचे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना तसेच माजी मुख्यमंत्री, ठाकरे गटाचे दिवंगत नेते मनोहर जोशी यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
मनोहर जोशी हे १३ व्या लोकसभेचे अध्यक्षही होते. १९९५ ते ९९ या काळात जोशी यांनी युतीचे मुख्यमंत्री पदही सांभाळले होते. बाळासाहेब ठाकरेंच्या निष्ठेपायी ते अखेरच्या श्वासापर्यंत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी प्रामाणिक राहिले. ठाकरे गटाच्या या दिवंगत नेत्याला यंदा मरणोत्तर पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
याचबरोबर भाजपाचे दिवंगत नेते सुशील कुमार मोदी (मरणोत्तर) सार्वजनिक व्यवहार यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुशीलकुमार मोदी हे बिहारचे नेते होते. त्यांनी विरोधीपक्ष नेतेपद, राज्यसभेचे सदस्यत्वपद भुषविले आहे. त्यांचे १३ मे २०२४ मध्ये निधन झाले होते.
पद्मविभूषण... - दुव्वुर नागेश्वर रेड्डी (वैद्यक)- न्यायाधीश (निवृत्त) जगदीश सिंह खेहर (सार्वजनिक व्यवहार)- कुमुदिनी रजनीकांत लाखिया (कला)- लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम (कला)- एम. टी. वासुदेवन नायर (साहित्य आणि शिक्षण) मरणोत्तर- ओसामु सुझुकी (व्यवसाय आणि उद्योग) मरणोत्तर- शारदा सिन्हा (कला) मरणोत्तर
पद्मभूषण...
- ए सूर्य प्रकाश (साहित्य आणि शिक्षण - पत्रकारिता)- अनंत नाग (कला)- बिबेक देबरॉय (मरणोत्तर) साहित्य आणि शिक्षण- जतीन गोस्वामी (कला)- जोस चाको पेरियाप्पुरम (औषध)- कैलाशनाथ दीक्षित (इतर - पुरातत्व)- मनोहर जोशी (मरणोत्तर) सार्वजनिक व्यवहार- नल्ली कुप्पुस्वामी चेट्टी (व्यापार आणि उद्योग)- नंदमुरी बालकृष्ण (कला)- पीआर श्रीजेश (क्रीडा)- पंकज पटेल (व्यापार आणि उद्योग)- पंकज उधास (मरणोत्तर) कला- राम बहादूर राय (साहित्य आणि शिक्षण पत्रकारिता)- साध्वी ऋतंभरा (समाजकार्य)- एस अजित कुमार (कला)- शेखर कपूर (कला)- सुशील कुमार मोदी (मरणोत्तर) सार्वजनिक व्यवहार- विनोद धाम (विज्ञान आणि अभियांत्रिकी)