ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 30 - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भाजपाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांच्यासह अनेक मान्यवरांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी लोकसभेचे दिवंगत अध्यक्ष पी. ए. संगमा, मध्य प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांना मरणोत्तर पद्म पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.शरद पवार यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करताना खासदार सुप्रिया सुळे भावुक झाल्या होत्या. यावेळी अजित पवारही उपस्थित होते. तसेच विराट कोहली, अनुराधा पौडवाल, स्वामी निरंजनानंद सरस्वती, शेफ संजीव कपूर, कैलाश खेर यांच्यासारख्या दिग्गजांचा पद्म पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
- राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कार प्रदान सोहळा कार्यक्रमास सुरुवात - डॉ. अनुराधा पौडवाल यांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव - विराट कोहली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित- बहुआ देवी यांना पद्मश्री प्रदान - मदन गोडबोले यांना पद्मश्री प्रदान- मुरली मनोहर जोशींना पद्मविभूषण प्रदान- के. जे. येसुदास (गायक), सदगुरू जग्गी वासुदेव (अध्यात्म), प्रा. उडिपी रामचंद्र राव (विज्ञान आणि अभियांत्रिकी) यांना पद्मविभूषण पुरस्कार