मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यू यॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये केलेले भाषण विविध चॅनेलवर दाखविणे, हा पेड न्यूजचा प्रकार असल्याची तक्रार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोग व राज्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे. विविध चॅनेलवर हे भाषण जाहिरात म्हणून दाखविण्यात आले. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मतदारांवर प्रभाव टाकण्याचा हेतू यामागे होता हे स्पष्ट आहे. त्यासाठी चॅनेल्सवरील एक स्लॉटच विकत घेण्यात आला होता. बातम्यांची जागा या भाषणाने घेतली. मोदींना फोकस करण्याचा हा प्रकार पेड न्यूजसारखाच असल्याचे प्रदेश काँग्रेसने म्हटले आहे. मोदी यांनी न्यू यॉर्कमध्ये पंतप्रधान म्हणून भाषण केले होते. भाजपाचे नेते म्हणून त्यांचे ते भाषण नव्हते. त्यामुळे ते भाषण शासकीय स्वरूपाचे मानले पाहिजे. असे भाषण निवडणूक प्रचारात वापरणे हा निवडणूक आयोगाच्या नियमाचा भंग असल्याची भूमिका काँग्रेसने तक्रारीत घेतली आहे. (प्रतिनिधी)
पंतप्रधानांच्या भाषणाची जाहिरात ही तर पेड न्यूज
By admin | Published: October 13, 2014 5:40 AM