सातारा : विद्यार्थी आहेत की भारवाहक, असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराकडे पाहून पडतो. वीस ते साडेबावीस किलो वजन असणारी शाळकरी मुलं चक्क साडेचार ते सव्वापाच किलोचे दप्तर रोज पाठीवर वागवतात. याचे काय गंभीर परिणाम होऊ शकतात, याचे वास्तव वास्तव ‘लोकमत’नं सचित्र लोकांसमोर मांडलं. त्याला जिल्ह्यातील ५८ पेक्षा जास्त शाळांनी अनुकूल प्रतिसाद दिला.‘लोकमत’ने विविध शाळांमध्ये जाऊन मुलांचे अन् त्यांच्या दप्तरांचे वजन घेतले. यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या पाठीवर त्याच्या वजनाच्या वीस ते पंचवीस टक्के (एक पंचमांश ते एक चतुर्थांश) वजनाच्या दप्तराचं ओझं असते, हे सत्य समोर आलं. या ओझ्यामुळे मुलांच्या पाठीला कुबड येण्याची शक्यता अस्थिरोग तज्ज्ञांनी वर्तविली आहे. थोडा विचार, पालक-शाळांमध्ये सुसंवाद, पालकांचं अज्ञान, अवास्तव भीती दूर करणं, शाळेनं दिलेल्या सूचनांचं काटेकोर पालन असे उपाय योजले गेल्यास दप्तराचं वजन काही प्रमाणात का होईना, कमी करणं शक्य आहे, यासाठी ‘लोकमत’ने चळवळ उभी केली. त्याला जिल्ह्यातील शाळांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. ‘लोकमत इनिशिएटिव्ह’मुळे मुलांच्या दप्तराचं ओझं निम्म्यानं कमी झालं अन् चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. (लोकमत चमू)च्बसण्याच्या फरशीला काळा रंग देऊन पाटीसारखा वापर, दप्तर शाळेत ठेवण्यासाठी रॅकची सोय, चित्रकलेच्या वहीऐवजी शाळेकडूनच पेपर वाटप, वर्कबुक बंद केले, ठरलेल्या दिवशीच व्यवसाय व स्वाध्याय पुस्तिका शाळेत आणाव्यात, ई-लर्निंगमुळे दप्तराचे ओझे कमी होण्यास मदत, जुनी पुस्तके शाळेत तर नवीन पुस्तके घरच्या अभ्यासाठी, फक्त भाषा विषयांचीच पुस्तके शाळेत आणणे, प्रयोगवही, कला, गृहपाठाच्या वह्या आठवड्यात एकदा शाळेत आणणे, तासिकानिहाय पुस्तके, वह्या आणणे, पोषणआहार, पाणी शाळेत असल्याने घरातून डबा आणण्याची गरज नाही.च्सुलभ शिक्षणासाठी अॅप्स तयार केले, गतवर्षीच्या विद्यार्थ्यांकडून सर्व जुनी पुस्तके जमा करून पुनर्वापर, रोज तीन विषयांचाच अभ्यास, तीन विषयांसाठी एक वही, वर्गपाठासाठी सर्व विषयांना एकच वही, शंभर पानी वही वापरण्याच्या सूचना, पहिलीसाठी एका वहीत दोन विषय, रोज दप्तर तपासणी केली जाते, सॅकला बंदी.
वेदना संपल्या, चेहऱ्यावर फुलले हास्य!
By admin | Published: July 06, 2015 1:59 AM