शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

तिच्या जाण्याच्या दु:खातही वडिलांनी दिली जगाला नवी दृष्टी!

By admin | Published: December 13, 2015 9:09 PM

मृत व्यक्तीची संमती घेतली नसली तरी केवळ नातेवाईकांच्या संमतीने नेत्रदान करता येते.

चिपळूण : केवळ अठराव्या वर्षीच त्यांची मुलगी निपचित पडलेली...आपल्या लाडक्या लेकीचा अवचित झालेला मृत्यू सहन न करू शकणाऱ्या तिच्या वडिलांना अचानक नजरेसमोर अंधपणामुळे काळवंडलेलं आयुष्य घेऊन जगणारी बालकं आठवली आणि त्यांनी लागलीच आरोग्य विभागाशी संपर्क साधला. आभाळाएवढं दु:खं असतानाही त्यांनी आपल्या लाडक्या लेकीचे नेत्रदान करून एक वेगळा आदर्श जगासमोर ठेवला.वालोटी - सुतारवाडी येथील भाग्यश्री भरत सुतार यांचे राहत्या घरी ऐन तारुण्यात १८व्या वर्षी निधन झाले. त्यांचे वडील भरत बाळाराम सुतार यांनी स्वत:चे दु:ख बाजूला ठेवून सामाजिक जाणीव जपत मुलीचे नेत्रदान करुन एक आदर्श घडवला आहे. सकाळी सहा वाजता मुलीच्या मृत्यूनंतर लगेचच कळकवणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्यसेवक प्रफुल्ल विलास केळस्कर यांना कळवले. सह्याद्री निसर्गमित्रचे उदय पंडित, डॉ. ग. ल. जोशी, प्रफुल्ल विलास केळसकर यांनी त्यांच्या घरी जाऊन भाग्यश्री भरत सुतार यांचे नेत्र (कॉर्निया) पंधरा ते वीस मिनिटात काढून सह्याद्री निसर्गमित्रच्याकार्यकर्त्यांच्या हाती सुपूर्द केले. सह्याद्रीच्या कार्यकर्त्यांनी या कॉर्निया पाठवण्याच्या खास एम. के. मीडियम या औषधातून व विशेष बनवलेल्या अतिथंड बॉक्समधून त्वरित सांगली येथील दृष्टीदान आय बँक, डॉ. मिलिंद किल्लेदार यांच्याकडे पाठवले.कळकवणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्यसेवक डॉ. प्रफुल्ल विलास केळस्कर यांनी आरोग्य केंद्राच्या आजुबाजूच्या गावांमध्ये नेत्रदान जागृती चालू केली आहे. या जागृतीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना नेत्रदानाचे महत्व पटत आहे. नेत्रदान म्हणजे मृत्यूनंतर माणसाच्या डोळ्यामधील काळ्या बुबुळाची वरची १/२ मिलिमीटर जाडीची चकती (कॉर्निया) काढून ती अंध व्यक्तीला बसवणे. नेत्रदानात संपूर्ण डोळा काढला जात नाही. हे मृत्यूनंतर ६ तासात करणे आवश्यक असते. मृत व्यक्तीची संमती घेतली नसली तरी केवळ नातेवाईकांच्या संमतीने नेत्रदान करता येते. (प्रतिनिधी)जिल्हा आरोग्य विभाग, रत्नागिरी, सह्याद्री निसर्ग मित्र, चिपळूण, डॉ. ग. ल. जोशी व इतर सर्व नेत्रतज्ज्ञ यांनी चालू केलेल्या नेत्रदान चळवळीला चालना मिळत आहे. गेल्या दहा महिन्यात नऊ नेत्रदान झाली असून, अठरा अंध व्यक्तींना दृष्टी प्राप्त झाली आहे.