शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
3
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
4
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
5
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
7
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
8
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
9
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
10
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
11
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
12
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर
13
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
14
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
15
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
16
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
17
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
18
प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली ‘ती’ घरे होणार नियमित; नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये सर्वेक्षण
19
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
20
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप

पाकिस्तानातील कॉल वाढले

By admin | Published: February 27, 2016 2:03 AM

पाकिस्तान इंटेलिजन्स आॅपरेटीव्हज (पीआयओ) कडून भारतातील लष्कराविषयीची माहिती काढून घेण्यासाठी जवानांना येणाऱ्या फोन कॉलमध्ये वाढ झाली आहे. इतकेच नाही तर अधिकाऱ्यांच्या

पुणे : पाकिस्तान इंटेलिजन्स आॅपरेटीव्हज (पीआयओ) कडून भारतातील लष्कराविषयीची माहिती काढून घेण्यासाठी जवानांना येणाऱ्या फोन कॉलमध्ये वाढ झाली आहे. इतकेच नाही तर अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनाही अशापद्धतीचे फोन येत आहेत. त्यामुळे लष्कराशी संबंधित प्रत्येक व्यक्तीने तसेच सामान्य नागरिकांनाही याविषयी काळजी घ्यावी, असे आवाहन पुण्याच्या दक्षिण मुख्यालयाचे लेफ्टनंट जनरल बिपीन रावत यांनी केले आहे. मी लष्करातील एक अधिकारी बोलतोय, विशिष्ट व्यक्ती आता कुठे आहे, कोणत्या मोहीमेवर काम करत आहे अशा प्रकारची गुप्त माहिती विचारणारे फोन येत आहेत. आपला वरिष्ठ अधिकारी बोलतोय म्हटल्यावर जवानांकडूनही अशी माहिती तत्काळ सांगितली जायची.मात्र अशा प्रकाची चौकशी करणारे फोन आले तर समोरच्या व्यक्तीला त्याचा फोन नंबर विचारावा आणि आपण पुन्हा कॉल करु, असे सांगावे. समोरुन बोलणाऱ्या व्यक्तीने फोन कट केला तर तो कॉल बनावट असल्याचे सहज लक्षात येते. याबाबत सुरक्षा बाळगण्याच्या विशेष सूचना लष्कराला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यासंबंधी बोलताना रावत म्हणाले, इतके दिवस केवळ जवान किंवा अधिकाऱ्यांना पीआयओकडून येणारे फोन आता अधिकाऱ्यांच्या मुलांनाही यायला लागले आहेत. त्यावरुन वडील कुठे आहेत, कधी येणार अशी विचारणा या मुलांना होत आहे. त्यामुळे सर्वांनी सतर्क राहून त्याचा सामना करण्याची आवश्यकता आहे. अनेकदा नागरिकांनाही पाकिस्तानमधून अशाप्रकारचे फोन येतात. अशावेळी तातडीने जवळच्या पोलिस स्टेशनला तसेच लष्कराशी संबंधित अधिकाऱ्यांना याची माहिती द्यावी, असे रावत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)