शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

पालिका ‘कॅम्पा कोला’ला आज बजावणार नोटीस

By admin | Published: June 09, 2014 2:52 AM

सर्वोच्च न्यायालयाची प्रत अद्याप महापालिका प्रशासनाला मिळाली नसल्याच्या कारणास्तव आता ९ जून (सोमवार) रोजी कॅम्पा कोलातील रहिवाशांना नोटीस बजावण्यात येणार आहे.

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाची प्रत अद्याप महापालिका प्रशासनाला मिळाली नसल्याच्या कारणास्तव आता ९ जून (सोमवार) रोजी कॅम्पा कोलातील रहिवाशांना नोटीस बजावण्यात येणार आहे.कॅम्पा कोलाच्या रहिवाशांनी पुन्हा दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर त्यांनी येथील सदनिका रिकाम्या केल्या आहेत. तात्पुरता निवारा म्हणून कॅम्पा कोला कम्पाउंडमध्ये तंबू ठोकला आहे. मागील मंगळवारीच कॅम्पा कोलाच्या रहिवाशांना पालिका प्रशासनाच्या वतीने नोटीस बजावण्यात येणार होती. मात्र केवळ सर्वोच्च न्यायालयाची प्रत प्राप्त झाली नसल्याच्या कारणास्तव ही कार्यवाही विलंबाने होत आहे.पालिकेने बजावलेल्या नोटिसीची मुदत संपल्यानंतर येथील वीज आणि गॅसपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. शिवाय येथील बेकायदा मजले पाडण्यासाठी कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात येत आहे. त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. पालिकेला अतिरिक्त मनुष्यबळाच्या मदतीने प्रथमत: इथल्या आतील भिंती जमीनदोस्त करता येतील, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांनी दिली.कम्पाउंडमध्ये रहिवाशांकडून उभारलेल्या तंबूला पावसाळ्यात तरी किमान अभय द्यावे, अशी मागणी पालिकेच्या जी-नॉर्थच्या सहायक अभियंत्यांकडे केली आहे, अशी माहिती कॅम्पा कोलाच्या प्रवक्त्या नंदिनी मेहता यांनी दिली. (प्रतिनिधी)