पुणे : भारतीय आॅस्करच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी येथील फिल्म अॅँड टेलीव्हिजन इस्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय) संस्थेला भेट दिली. मात्र ‘एफटीआयआय’मध्ये त्यांचे स्वागत करायलाच काय पण त्यांच्या ‘दायरा’ या चित्रपट स्क्रिनिंगलाही विद्यार्थी नसल्याने ते रद्द करून त्यांनी केवळ विद्यार्थ्यांची शाळा घेतली. ‘या संपाला प्रतिष्ठेचा मुद्दा बनवता कामा नये’ असा सल्ला देऊन त्यांनी या संस्थेमधून काढता पाय घेतला.‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांनी शासनाच्या विरोधात आंदोलनाचे शस्त्र उगारल्यानंतर पालेकर यांनी तात्काळ विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला होता. मंगळवारी पालेकर यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन आंदोलनाची सद्यस्थिती जाणून घेतली. (प्रतिनिधी)‘दायरा’ चित्रपट ‘स्क्रीनिंग’वेळी विद्यार्थ्यांना प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे क्लासरूमच्या चाव्या मिळण्यास काहीसा विलंब लागला. त्या चाव्या मिळाल्यानंतरही विद्यार्थीसंख्या पुरेशी नव्हती. ही सर्व परिस्थिती पहाता त्यांनी ‘स्क्रीनिंग’ करण्यासाठी ही योग्य वेळ नसल्याचे सांगत केवळ विद्यार्थ्यांनी चर्चा केली.
विद्यार्थ्यांची पालेकरांनी घेतली शाळा
By admin | Published: August 26, 2015 3:29 AM