मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता अभियानाचा उपक्र म म्हणून राज्यात २ आॅक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत स्वच्छता पालखी कार्यक्र म राबविण्यात येणार आहे.अभियानाचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी षण्मुखानंद सभागृह येथे सकाळी हिरवा झेंडा दाखवून करण्यात येणार आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यावेळी उपस्थित राहणार आहेत.स्वच्छतेचे प्रणेते संत गाडगेबाबा यांनी ज्या गाडीतून जागोजागी जाऊन गावागावातील लोकांना स्वच्छतेचे महत्त्व विशद केले त्या गाडीचे पालखीत रूपांतर करून त्याद्वारे सर्व जिल्ह्यांमधील ग्रामीण भागात स्वच्छतेची जनजागृती केली जाईल.स्वच्छता पालखीचे मार्गक्र मण कोकण विभागात २ ते ११ आॅक्टोबर, पुणे विभागात १२ ते २० आॅक्टोबर, नाशिक विभागात २१ ते २९ आॅक्टोबर, औरंगाबाद विभागात ३० आॅक्टोबर ते ११ नोव्हेंबर, नागपूर विभागात १२ ते २१ नोव्हेंबर आणि अमरावती विभागात २२ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. याचा समारोप संत गाडगेबाबा यांच्या अमरावती येथील समाधीस्थळी होईल.(विशेष प्रतिनिधी)
गाडगेबाबांच्या गाडीचे पालखीत रूपांतर
By admin | Published: October 02, 2016 1:23 AM