मुंबई, दि. 17 - मुंबईमध्ये एक परिवाराच्या जेवणात मेलेली पाल सापडल्याचे वृत्त समोर आले आहे. मेलेली पाल असलेले पालक पनीर खाल्ल्यानंतर कुटुंबातील 5 जणांच्या प्रकृतीत बिघाड झाला. यात एका 4 वर्ष व एक वर्षाच्या लहान मुलाचा समावेश आहे. खोंडोबाई बनसोडे(वय 59 वर्ष), सुरेखा साळवी (वय 27 वर्ष), दिलीप (वय 35 वर्ष) व दोन लहान मुले सम्यक बनसोडे (वय 4 वर्ष) आणि विवान साळवी (वय 1 वर्ष) अशी या पाच जणांची नावं आहेत. या सर्वांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आता सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
मात्र, पालक पनीरमध्ये पाल आली कशी?, याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. हे सर्व जण कांदिवली पूर्व परिसरातील रहिवासी आहेत. राजेंद्र बनसोडे यांच्या वडिलांचे 7 ऑगस्ट रोजी निधन झाले होते, यानंतर सर्व नातेवाईक त्यांच्याच घरात राहत होते. त्यांची बहिणी सुरेखा आणि वहिनी अस्मिता या दोघींनी मिळूनच जेवण तयार केले होते. त्यांची आई खोंडोबाई बनसोडे, सुरेखा, भाऊ दिलीप आणि त्यांचा मुलगा सम्यक व भाचा विवान हे सर्व जण पहिल्या पंगतीत जेवण्यास बसले. यावेळी सुरेखाला जेवणाच्या ताटात पाल असल्याचे आढळून आले.
आणखी बातम्या वाचा(राजौरीजवळच्या नियंत्रण रेषेवर जम्मू-काश्मीर सरकार बनवतंय 100 बंकर्स)(मराठवाड्यातील २५०० कुटुंबांचे स्थलांतर!)(तीन दिवस पावसाचे; वेधशाळेचा अंदाज)
तिनं याबाबत राजेंद्रला सांगितले व त्यानंतर घरातील सर्वांना उलट्यांचा त्रास होऊ लागला. पाल प्रकरणाबाबत सुरेखाला विचारले असता तिने सांगितले की, लहान मुलं उपाशी होती, म्हणून पालक पनीर बनवलं होते. अर्धी पोळी पोटात गेल्यानंतर मला ताटात पाल आढळून आली. दरम्यान, यानंतर सर्वांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले. आता सर्वांची प्रकृती स्थिर आहेत, अशी माहिती हॉस्पिटलच्या डीननं दिली आहे.