मुंबई : बलात्कारापेक्षा शरीरावर 16 वार ङोलत तब्बल अर्धा तास प्रतिकार करून मृत्युमुखी पडलेल्या अॅड़ पल्लवी पूरकायस्थची हत्या ही विरळातील विरळ घटना नसल्याचा धक्कादायक निष्कर्ष नोंदवत सत्र न्यायालयाने सोमवारी यातील आरोपी खाजगी सुरक्षारक्षक साजीद मुघलला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली़
सत्र न्यायाधीश वृषाली जोशी यांनी हा निकाल दिला़ माङया मते या खटल्यात सादर झालेल्या पुराव्यांच्या आधारे ही घटना विरळातील विरळ असल्याचे स्पष्ट होत नाही, असे नमूद करत न्यायालयाने साजीदला शिक्षा ठोठावली़ यावर अश्रू गाळत साजीदने कमी शिक्षेची विनंती केली़ मात्र या गुन्ह्यासाठी गंभीर शिक्षेची तरतूद असतानाही तुला जन्मठेप ठोठावली जात आहे, असे न्यायालयाने साजीदला सांगितल़े तसेच विनयभंग व घुसखोरीच्या गुन्ह्यासाठी न्यायालयाने साजीदला स्वतंत्र शिक्षा सुनावली़
दोन वर्षापूर्वी ही घटना घडली़ वडाळा येथे एका उच्चभ्रू सोसायटीत अॅड़ पल्लवी तिचा प्रियकर अविक सेनगुप्तासोबत राहत होती़ तेथे मूळचा जम्मू-काश्मीरचा असलेला साजीद सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता़ वासनेची भूक मिटवण्यासाठी साजीद
9 ऑगस्ट 2क्12 रोजी अॅड़ पल्लवीच्या घरात घुसला़ त्या वेळी तिने प्रतिकार केला़ अखेर सोळा वार करून साजीदने अॅड़ पल्लवीला ठार केल़े त्यानंतर तो जम्मूला पळून जात होता़ पोलिसांनी त्याला मुंबई सेंट्रल स्थानकातून अटक केली व त्याच्यावर हत्या, विनयभंग व घुसखोरीचे आरोपपत्र दाखल करण्यात आल़े दरम्यान, अॅड़ पल्लवीचा खून तिचा प्रियकर अविकनेच केल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने केला होता़ न्यायालयाने तो फेटाळला़ (प्रतिनिधी)
या निकालाने इतरांना वचक बसेल व कोणी असे कृत्य करायला धजावणार नाही, असे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणाले.
आमचे मुद्दे ग्राह्य धरले नाहीत़ त्यामुळे या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे बचाव पक्षाचे वकील अॅड़ वाहब खान यांनी सांगितले.
हा निकाल समाधानकारक नाही़ आमची मुलगी धाडसी होती़ सोळा वार होत असतानाही ती प्रतिकार करत होती़ त्यामुळे साजीदला फाशी होणो अपेक्षित होते, अशी खंत अॅड. पल्लवीच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.