नीलेश मोरजकर । लोकमत न्यूज नेटवर्कबांदा (जि. सिंधुदुर्ग) : पावसाळ्यात मगरींचा प्रजननाचा काळ असतो. या काळात मादीला आकर्षित करण्यासाठी मगरी मोठ्या संख्येने नदीकिनारी पहुडलेल्या असतात. यंदा अद्याप पावसाला जोर नसूनही तेरेखोल नदीपात्रालगत सध्या महाकाय मगरी दृष्टीस पडत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत या भागात ३० हून अधिक वेळा मगरींकडून हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये कित्येक जनावरांना मगरींनी फाडून खाल्ले आहे, तर कित्येक जनावरे व शेतकरी जखमी झाले आहेत. दरम्यान, वन अधिनियम कायद्यानुसार मगरींना मारता किंवा जायबंदी करता येत नसल्याने वनखाते या मगरींचा बंदोबस्त करण्यात असमर्थ ठरत आहे.
तेरेखोल नदीपात्रात मगरींची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2017 1:44 AM