अहमदनगर जिल्ह्यात कृषी प्रक्रिया केंद्राची स्थापनाअकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने अनेक नवे संशोधन, बियाणे निर्मिती करू न हरितक्रांतीमध्ये सहभाग नोंदवला आहे. शेतकऱ्यांनी आता शेतमालावर प्रक्रिया उद्योग उभारावेत, यासाठीचा पुढाकार घेतला आहे. या कृषी विद्यापीठाने तयार केलेली अनेक उपकरणे, प्रक्रिया यंत्रांची मागणी वाढली असून, रविवारी अहमदनगर येथील पाथर्डी येथे कृषी प्रक्रिया केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.भारतीय कृषी संशोधन परिषद, दिल्ली अंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प देण्यात आला असून, येथे संपूर्ण राज्यासाठी कृषी प्रक्रियेशी संबंधित नवनवीन तंत्रज्ञानाचे संशोधन करण्यात येत आहे. तद्वतच शेतकरी, महिला व ग्रामीण तरुण, बेरोजगारांना गरजेनुसार कृषी प्रक्रिया तंत्रज्ञान पुरविल्या जाते. याकरिता राष्ट्रीय स्तरावरील कापणीपश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, या कृषी विद्यापीठात उपलब्ध आहे. या केंद्रांतर्गत अनेक तंत्रज्ञान, यंत्र विकसित करण्यात आली असून, यामध्ये विकसित पीकेव्ही डाळ गिरणी, शेवई,गहू प्रक्रिया यंत्र, इतर अनेक शेकडो प्रक्रिया यंत्र विकसित केली आहेत. यातील पीकेव्ही दाल मिल, शेवई, गहू प्रक्रिया व कांडपयंत्र या कृषी विद्यापीठाच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली अहमदनगर येथील पाथर्डी या गावात लावण्यात आले आहे. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कापणीपश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभागाचे संशोधन अभियंता डॉ. प्रदीप बोरकर, उद्घाटक म्हणून अहमदनगर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे यांची उपस्थिती होती. तालुका कृषी अधिकारी किरण मोरे, बी.बी. चितळे, डॉ.पंदेकृविचे प्रा. किशोर शिंदे यांची उपस्थिती होती.
पंदेकृविचे तंत्रज्ञान पश्चिम महाराष्ट्रात!
By admin | Published: April 25, 2017 12:48 AM