वैष्णवांचा मेळा पटकांचा भारवाखरीस जमला भक्तीचा सागर पांडुरंगाच्या भेटीसाठी केला आटापिटा भक्तीसागरात उसळती भक्तीच्या लाटा..! - तेजस टवलारकर पंढरपूर : तुकाराम महाराजाचा पालखी सोहळा हा आता अंतिम टप्यात आला आहे,. त्यामुळे वारकऱ्यांना पंढरीरायाला भेटण्याची उत्सुकता लागली आहे. ऊन, वारा, पाऊस, याचा मारा झेलत आतापर्यंतचा प्रवास वारकऱ्यांनी केला आहे . राज्य भरातून वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. काही भागात पाऊस आहे, तर काही भागात अजून देखील म्हणावा तसा पाऊस झालेला नाही तरीदेखील वारकरी निराश न होता माऊली, तुकारामाचा जयघोष करीत, रिगणं, खेळ, भारुड , आदींचा आनंद घेत पंढरीरायाच्या दर्शनाला आनंदात जात आहे.
आता अंतर कमी असल्यामुळे पिराची कुरोली येथून मुक्काम आटपून दुपारी पालखी सोहळा वाखरीच्या दिशेने मार्गस्थ झाला, यावेळी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. सर्वत्र माऊलीचा आणि तुकारामांचा जयघोष सुरू होता. टाळ, मृदंगाचा गजर सुरू होता , झेंडेकरी झेंडे फडकवत होते, अशा भक्तिमय वातावरण पालखी सोहळा बाजीराव विहीर परिसरात पोहचला आकाशातून जसजसा पावसाचा रंग चढत होता तसा वारकऱ्यांचा उत्साह हा वाढतच होता. सर्वत्र माऊली तुकारामाचा गजर सुरू होता. पावसाचा आनंद घेत वारकरी नाचत होते. त्यानंतर सर्व वारकऱ्यांना आतुरता लागली होती ती बाजीराव विहीरीजवळ होणाऱ्या उभ्या रिंगणाची अश्व रिंगण स्थानी आले आणि सर्वत्र जयघोष सुरू झाला.आकाशातून बरसणारा पाऊस , सर्वत्र फडकणाऱ्या भगव्याला पताका अशा भक्तिमय वातावरणात तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे उभे रिंगण पूर्ण झाले हा संपूर्ण सोहळा न भूतो न भविष्यती असा होता.बाजीराव विहीर परिसरात विठ्ठल नामाच्या गजर करत समस्थ वारकरी भक्ती रसात व वरुणराजाच्या वर्षवात चिंब भिजला होता. आपल्या सावळ्या विठ्ठलाचे रुप पाहण्यासाठी आणि त्यांच्या दर्शनासाठी अतुरलेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता. बाजीराव विहीर परिसरात तुकोबांच्या दर्शनासाठी वारकरी भाविकांनी गर्दी केली होती. तसेच पालखी सोबत आलेल्या वारकऱ्यांचे दर्शन घेण्यासाठीही भाविकांचे हात आपसूक खाली जात होते. पंढरीची वारी जयाचिया कुळी... त्याची पाय धुळ लागो मज या संत वचनाप्रमाणे वारकऱ्यांच्या चरणाची धूळ आपल्या मस्तकी लागावी यासाठी भाविक आतुरलेला होता. हा रिंगण सोहळ्यानंतर संताच्या पालख्या वाखरी येथे मुक्काम करुन हा वैष्णवांचा मेळा उद्या पंढरीकडे मार्गस्थ होणार आहे..........................सर्व पालख्या वाखरीत मुक्कामी पंधरपुरला विठ्ठरायाच्या भेटीला जाणाऱ्या सर्व पालख्याचा मुक्काम बुधवारी वाखरीत असणार आहे. त्यामुळे वाखरीत वारकऱ्यांची , प्रचंड गर्दी झाली आहे. बुधवारचा मुक्काम आटपून गुरुवारी सर्व संतांचा पालखी सोहळा पंढरपूरला पोहचेल. परिसरातील भाविकांनी पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली आहे............घरो घरी जेवणावळी पालखी सोहळा हा अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे.वारकऱ्यांची प्रचंड गर्दी झाली आहे.पालखी सोहळा ज्या गावातून जातो, त्या सर्व गावात घरो घरी जेवणावळीचे आयोजन करण्यात आले आहे. ...................पावसामुळे उत्साहात पडली भर पंढरपूरला जाणाऱ्या सर्व पालख्या या एकाच मार्गानि जात आहेत.आघावया काही अंतरावर पंढरपूर येऊन ठेपल आहे. त्यात पाऊस आल्याने वारक?्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.