ऑनलाइन लोकमतपंढरपूर, दि. २४ - पंढरपूर तालुक्यातील लोकसंख्येत वारंवार वाढ होत आहे. त्याचबरोबर विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात भरणाऱ्या चार यात्रेत येणाऱ्या भाविकांची संख्याही असल्याने पोलीस यंत्रणेवर जादा ताण पडत आहे. यामुळे पोलीस प्रशासनाकडून पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे विभाजन करुन नविन पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे सुरु करण्यात येत आहे. पुर्वी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्या अंतर्गत १०२ गावांचा कार्यभार होता. मात्र यातील २६ गावांचे विभाजन करुन करकंब पोलीस ठाणे सुरु करण्यात आले. आता पुन्हा पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे विभाजन करुन २४ गावांसाठी नविन स्वतंत्र ग्रामीण पोलीस ठाणे सुरु करण्यात येणार आहे. यामुळे पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र ५२ गावांचे राहिले आहे. यामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांना तत्काळ पोलीसांकडून मदत मिळण्यास होणार आहे.
पंढरपूर येथे नव्याने सुरु होत असलेल्या ग्रामीण पोलीस ठाण्याला योग्यती जागा मिळत नव्हती. ग्रामीण पोलीस ठाणे इसबावी येथे सुरु करण्याचे पोलीस प्रशासनाकडून ठरविण्यात आले. मात्र त्या ठिकाणी काही अडचणी निर्माण झाल्या. यामुळे आता हे नविन पोलीस ठाणे उजनी सांस्कृतीक हॉलच्या परिसरातील आर.टी.ओ. कॅम्प भरणाऱ्या ठिकाणी हे नविन पोलीस ठाणे सुरु होणार आहे. या पोलीस ठाण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ६३ जणांचा स्टाफ मंजूर आहे.
या जागेत एक पोलीस निरक्षकाची खोली, ग्रामस्थांच्या तक्रारी घेण्यासाठी ठाणे अंमलदारची खोली, तसेच वायरलेस विभागाची एक खोली, पोलीस ठाण्याचे दस्ताऐवज ठेवण्यासाठी एक खोली असणार आहे. असे नविन ग्रामीण पोलीस ठाणे २४ गावांसाठी निर्माण करण्यात येणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिक्षक यांनी सांगितले.
या गावांसाठी पोलीस ठाणेकौठाळी, शिरढोण, वाखरी, शेळवे, खेडभाळवणी, भंडीशेगांवू, तिसंगी, पिराची कुरोली, वाडी कुरोली, गादेगांव, उपरी, सोनके, शेंडगेवाडी, केसरकरवाडी, जैनवाडी, भाळवणी, धोंडेवाडी, सुपली, पळशी, गार्डी, लोणारवाडी, कोर्टी, बोहाळी, उंबरगांव
असा असणार स्टाफपोलीस निरक्षक - १सपोनि. - १पो.उपनि. - ३सपोउनि. - ९पो.हवा. - १५पो.ना. - १५पो.शि. - १९
पालखी मार्गाचे कार्यक्षेत्र; जादा जबाबदारी
नविन सुरु होणाऱ्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात पालखी मार्गावरची जादा गावे आहेत. पुर्वी सर्व कर्मचाऱ्यांना पंढरपूर शहर पोलीस ठाण्यामध्यून काम करण्याच्या ठिकाणी जावे लागत होते. मात्र हे नविन पोलीस ठाणे यात्रा कालावधीत कमी गर्दी असते, अशा ठिकाणी आहे. यामुळे पालखी मार्गावरील यात्रेत कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी मोठ्या प्रमाणात याच पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर असणार आहे.