शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

पांडुरंगा... महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे!

By admin | Published: July 16, 2016 3:14 AM

राज्यावरचे अवर्षणाचं संकट दूर कर, शेतकरी सुखी होऊन हे राज्य सुजलाम् सुफलाम् व्हावे, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पांडुरंग चरणी घातले.

पंढरपूर : राज्यावरचे अवर्षणाचं संकट दूर कर, शेतकरी सुखी होऊन हे राज्य सुजलाम सुफलाम व्हावे, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पांडुरंग चरणी घातले.आषाढी एकादशी निमित्त फडणवीस यांनी पत्नी अमृता याच्यासह विठ्ठल, रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. मुख्यमंत्र्यांसोबत पूजा करण्याचा मान अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मौजे फुंदे टाकळी येथील वारकरी हरिभाऊ फुंदे व त्यांच्या पत्नी सुनिता यांना मिळाला. कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन, मत्स्य व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यावेळी उपस्थित होते. ‘आषाढी-कार्तिकी विसरू नका मज, देव गुज सांगतसे‘ या कळकळीच्या आळवणीला प्रतिसाद देत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या १० लाख भाविकांनी आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेऊन आषाढीची वारी पूर्ण केली. ‘वारी चुकू न दे हरी हीच’ आस मनी ठेवत दर्शन होताच धन्य पावलेल्या वारकऱ्यांनी परतीचा मार्ग धरला आहे. येथे आलेल्या विविध संतांच्या पालख्या नगर प्रदक्षणेसाठी बाहेर पडल्या. त्यामुळे प्रदक्षणा मार्गावरअखंड टाळ मृदंगाचा गजर कानी पडत होता. चंद्रभागेकाठी वारकऱ्यांचा महासागर लोटल्याचे चित्र दिवसभर दिसत होते. पाद्यदर्शन, मुख दर्शन व नामदेव पायरीचे दर्शन घेण्यासाठी मोठी रांग लागली होती. मुख्य दर्शन बारी गोपाळपूरपर्यंत गेली होती. कळसाचे दर्शन घेण्यासाठी चौफाळा येथे भाविकांची दाटी झाली होती. पुंडलिकाचे दर्शन घेऊन भाविकांना नामदेव पायरीजवळ दर्शन घेण्यासाठी महाद्वारात येण्यासाठी पोलिसांनी बॅरेकेटींग केल्यामुळे कसलाही त्रास झाला नाही. कळसाचेही व्यवस्थित दर्शन घेता आले. तब्बल ७० हजार भाविकांनी पांडुरंगाचे पददर्शन घेतले. एका मिनिटाला सुमारे ४० ते ४८ भाविकांनी विठ्ठलाच्या पायावर डोके ठेवून पुढे सरकत होते. त्याशिवाय मुखदर्शन, नामदेव पायरी दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या आठ ते दहा लाखांवर गेली असल्याची माहिती मंदिर समितीने दिली. (प्रतिनिधी)आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठलाची महापूजा केली. यावेळी मानाचे वारकरी हरिभाऊ फुंदे व सुनिता फुंदे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन, मत्स्य व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते.ज्यांच्यावर देव प्रसन्न होतो, त्यांनाच महापूजेची संधी मिळते. माझे आई- वडील दोघेही धार्मिक प्रवृत्तीचे होते. वडील कायम वारीला जायचे. माझी पत्नी गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून वारीला जात होती. मी सेवानिवृत्त होऊन चार वर्षे झाली.राज्य परिवहन महामंडळाने तीन हजार बसची सोय केल्याने वेळ नसलेल्या वारकऱ्यांनी एक दिवसाची वारी पोच केली. नियमित वारकरी द्वादशीचा उपवास सोडल्याशिवाय पंढरपूर सोडत नसल्याने आज केवळ एक दिवसाची वारी करणाऱ्या वारकऱ्यांनी परतीचा मार्ग धरला.