मुुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळयाप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) काल सार्वजनिक बांधकाम व गृहनिर्माण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली व त्यांचे जबाब नोंदवून घेतले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पंकज व समीर भुजबळ यांनाही चौकशीसाठी बोलावणे धाडले होते. मात्र दोघांनीही चौकशीला दांडी मारल्याचे एसीबीने सांगितले.एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सदन, तुळशी सोसायटी घोटाळ््याबाबत दोन माजी सेवानिवृत्त इंजिनिअर, एक चीफ इंजिनिअर आणि गृहनिर्माण विभागाचे डेस्क आॅफिसर यांच्याकडे काल दिवसभर चौकशी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, त्यांचे चिरंजीव पंकज, पुतणे समीर आणि अन्य संबंधितांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करून कोट्यवधींचे घोटाळे केले, या आरोपांची उघड चौकशी एसीबीच्या विशेष तपास पथकामार्फत सुरू आहे. याप्रकरणी आपच्या नेत्या अंजली दमानिया यांनी याचिका केली होती. सुनावणीत न्यायालयाने एसीबीला उघड चौकशीचे आदेश दिले होते. (प्रतिनिधी)
पंकज, समीर भुजबळ चौकशीला गैरहजर
By admin | Published: March 07, 2015 1:20 AM