संजीव कुटे -
अहमदनगर, दि. २ - शनिशिंगणापुरातील शनी चौथ-यावरील प्रवेशाचा वाद सुरु असताना ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी नगर जिल्ह्यातीलच पाथर्डी शहरात शनी चौथ-यावर जाऊन तेल वाहिले. महिलांना मंदिरात जाताना अडविता कामा नये, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर मुंडे यांनी हे शनिदर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार भीमराव धोंडे यांच्यासह इतर कार्यकर्ते होते़. या मंदिरात आजवर महिला दूरुनच शनिचे दर्शन घेत होत्या. ती परंपरा मुंडे यांनी झुगारली आहे.
दरम्यान, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई शिंगणापुरात पोहोचल्या आहेत. मात्र, त्यांना शनी चौथ-यावर प्रवेश दिलेला नाही. स्थानिक भाजप आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनीही महिलांना शिंगणापुरात शनी चौथºयावर जाऊ द्या, अशी मागणी केली आहे. माजी आमदार भानुदास मुरकुटे हेही महिलांना घेऊन शिंगणापुरात पोहोचले आहे. मात्र त्यांनाही अडविण्यात आले आहे. भानुदास मुरकुटे यांना चौथ-यापासून ढकलून बाहेर काढण्यात आले.
आष्टी तालुक्यातील धामणगाव कडे जाताना पाथर्डी येथील शनेश्वराचे दर्शन घेतले. pic.twitter.com/HHXRQ193rc— PankajaGopinathMunde (@Pankajamunde) April 2, 2016