शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
4
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
5
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
8
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
9
SSY की SIP…मुलीच्या भविष्यासाठी कुठे गुंतवावा पैसा, कनफ्युज असाल तर समजून कुठे मिळेल जास्त पैसा?
10
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
11
१६ दिवसांत ४८ लाख जोड्या अडकणार रेशीमगाठीत, ६ लाख कोटींची उलाढाल?
12
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
14
'कार्तिकी' यात्रेसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या, भाविकांसाठी मध्य रेल्वेचे नियोजन
15
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
16
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
17
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
18
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
19
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
20
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल

पंकजा मुंडेंच्या एन्ट्रीने तर्कवितर्क

By admin | Published: October 20, 2015 11:16 PM

काँग्रेस-राष्ट्रवादी बालेकिल्ला : कृष्णा कारखान्याच्या गळीत हंगामास प्रमुख उपस्थिती

अशोक पाटील-- इस्लामपूर पंधरा वर्षांच्या कालावधीनंतर कृष्णा कारखान्याची सत्ता सहकार पॅनेलप्रमुख डॉ. सुरेश भोसले यांच्याकडे आली. विधानसभा निवडणुकीपासून भोसले पिता—पुत्र भाजपमध्ये आहेत. परंतु त्यांनी कारखाना निवडणुकीत सर्व पक्षांना एकत्र केले होते. कारखाना कार्यक्षेत्रावर काँग्रेस व राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. या पक्षांचे संचालकही कारखान्यावर कार्यरत आहेत. असे असताना भोसले यांनी ग्रामविकास व महिला बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांना गळीत हंगामास पाचारण केले असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात प्रथमच मुंडे यांची एन्ट्री होत असल्याने राजकीय तर्कवितर्क सुरू झाले आहेत. कऱ्हाड, वाळवा व कडेगाव तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या कृष्णा सह. साखर कारखान्याची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळेच सभासदांनी आर्थिक बाजूने सक्षम असलेल्या डॉ. सुरेश भोसले यांच्या हाती कारखान्याची सत्ता दिली. वाळवा तालुक्यातील माजी मंत्री जयंत पाटील यांची राष्ट्रवादीची फौज त्यांच्या पाठीशी होती, तर काही कार्यकर्ते डॉ. इंद्रजित व अविनाश मोहिते यांच्या पाठीशी होते. कऱ्हाड व कडेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी भोसले यांना पाठिंबा दिला होता.जयंत पाटील यांचे समर्थक तिन्ही गटामध्ये विखुरल्याने त्यांनी तटस्थ भूमिका घेतली होती. परंतु दक्षिण कऱ्हाडचे माजी आ. विलासराव पाटील—उंडाळकर यांनी खुलेपणाने भोसले यांना पाठिंबा दिला होता. याच मतदार संघातील काँग्रेसचे आ. पृथ्वीराज चव्हाण, कडेगावचे आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या पाठीशी ताकद लावली होती. परंतु भोसले यांनी सर्वपक्षीय सवंगडी एकत्र केल्यानेच त्यांना विजयश्री खेचून आणता आली.‘कृष्णा’च्या नूतन संचालक मंडळामध्ये भाजपचे ८ संचालक वगळता उर्वरित ११ राष्ट्रवादीचे, तर २ काँग्रेसचे संचालक आहेत. अशी परिस्थिती असतानाही भोसले यांनी भाजपला ताकद देण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. कारखान्याच्या गळीत हंगामासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. परंतु ते उपलब्ध न झाल्याने महिला, बालकल्याण व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना कारखान्याच्या गळीत हंगामास पाचारण केले असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. कृष्णा कारखाना सक्षमपणे चालविणे हा अध्यक्षांसह संचालकांचा मुख्य उद्देश आहे. मंत्रिमंडळातील मंत्री हे लोकप्रतिनिधी म्हणून काम पाहत असतात. त्यामुळे पंकजा मुंडे यांना आमंत्रित करण्याचा विचार सुरु आहे. यामध्ये कोणतेही पक्षीय राजकारण नाही.- जितेंद्र पाटील, बोरगाव संचालक, कृष्णा कारखाना.भाजपची झालर...‘कृष्णा’च्या नूतन संचालक मंडळामध्ये भाजपचे ८ संचालक वगळता उर्वरित ११ राष्ट्रवादीचे, तर २ काँग्रेसचे संचालक आहेत. अशी परिस्थिती असतानाही भोसले यांनी भाजपला ताकद देण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. गळीत हंगामासाठी मुख्यमंत्री उपलब्ध न झाल्याने भोसले यांनी पंकजा मुंडे यांना कारखान्याच्या गळीत हंगामास पाचारण केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी, काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला भाजपची झालर लागणार आहे.