परळी (जि़बीड) : येथील प्रतिष्ठेच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना संचालकपदाच्या निवडणुकीत मंगळवारी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या पॅनलचा धुव्वा उडविला. २० पैकी रात्री नऊ वाजेपर्यंत जाहीर झालेल्या सर्व १२ जागांवर पंकजा यांच्या पॅॅनलने विजय मिळविल्यामुळे त्यांना कारखान्यावरील सत्ता कायम राखता आली. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर झालेल्या या निवडणुकीत पंकजा यांच्या नेतृत्वाचा कस लागला होता. कारखाना संचालकपदांच्या २० जागांसाठी पंकजा आणि धनंजय यांच्यात थेट लढत झाली. ४० उमेदवार रिंगणात होते. नऊ वाजेपर्यंत २० पैकी १२ जागांचा निकाल जाहीर झाला. पांगरी, नाथ्रा, परळी व सिरसाळा या ऊस उत्पादकांच्या गटातील प्रत्येकी ३ जागांवर पंकजा यांच्या वैद्यनाथ पॅनलच्या १२ उमेदवारांनी धनंजय यांच्या वैद्यनाथ शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांना धूळ चारली. (प्रतिनिधी)नवनिर्वाचित संचालक आणि त्यांना मिळालेली मते पांगरी गट - ज्ञानोबा मुंडे (४१८६), त्र्यंबक तांबडे (४२१६), श्रीहरी मुंडे (४१२१) नाथ्रा गट - पालकमंत्री पंकजा मुंडे (४३७७), भाऊसाहेब घोडके (४१३१), विद्यमान कारखाना उपाध्यक्ष नामदेवराव आघाव (४१२१) परळी गट - दत्तात्रय देशमुख (४२५३), माधव मुंंडे (४१३२), पांडुरंग फड (४१११) सिरसाळा गट - आ. आर. टी. देशमुख (४४०४), आश्रुबा काळे (४३३३),किसन शिनगारे (४२६५)
‘वैद्यनाथ’वर पंकजा मुंडेचे वर्चस्व
By admin | Published: April 29, 2015 1:44 AM