शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

'परळी सुन्न, राज्याची मान खाली गेली'; पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेवर अप्रत्यक्ष निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2021 3:33 PM

Dhananjay Munde : करुणा शर्मा प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची भाजपची मागणी.

बीड: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या कथित पत्नी करुणा शर्मा दोन दिवसांपूर्वी परळीत आल्या होत्या. त्या परळीत आल्यानंतर मुंडे समर्थकांकडून त्यांना प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला. यादरम्यान, जातीवाचक शिवीगाळ करणे आणि गाडीत पिस्तुल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या सर्व प्रकरणानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेल्या एका ट्विटचीही सध्या चर्चा होत आहे.

बीड जिल्ह्यातील परळी शहरात झालेल्या सर्व प्रकारानंतर पंकजा मुंडे यांनी राज्याची मान खाली गेल्याची प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं, 'अन्याय चुकीच्या लोकांच्यात ताकत असल्यामुळे होतो असे नाही, पराक्रमी हात बांधून बसतात म्हणुन होतो. शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था कुणी आपल्या दारात नाही बांधू शकत हा विश्वास हरवू नये, wrong president should not be set! ही काळाची गरज आहे. परळी सुन्न आहे, मान खाली गेली आहे राज्याची !!', अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी करुणा शर्मा प्रकरणावर भाष्य केलं. 

भाजपकडून करुणा शर्मा यांना पाठिंबाधनंजय मुंडे यांच्या कथित पत्नी करुणा शर्मा यांनी परळीत येऊन पत्रकार परिषद घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर त्या परळीत आल्यावर मुंडे समर्थकांकडून त्यांना प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला. त्यांच्या गाडीला घेराव घालून, घोषणाही देण्यात आल्या. यादरम्यान, त्यांच्या गाडीत एक पिस्तुल आढळल्याने घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला.

पण, त्यांच्या गाडीत एक व्यक्ती काहीतरी वस्तु ठेवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपकडून करुणा शर्मा यांना अडकवण्यात येत असल्याची प्रतिक्रिया देण्यात आली. करुणा शर्मा यांच्यावर अन्याय होत असल्याचं मत व्यक्त करत करुणा यांना मदत करणार असल्याची घोषणा भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी केली. करुणा शर्मा यांच्या गाडीमध्ये पिस्तूल टाकण्यातं आलं, त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेPankaja Mundeपंकजा मुंडेparli-acपरळीBeedबीड