बीड : वैद्यनाथ नागरी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या १७ जागांवर पंकजा मुंडे पुरस्कृत लोकनेते गोपीनाथ मुंडे जनसेवा पॅनलने सरासरी दहा हजार मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळविला, तर विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे पुरस्कृत वैद्यनाथ विकास पॅनलला एकही जागा मिळविता आली नाही. बहीण-भावामध्ये झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत पुन्हा पंकजा यांनीच बाजी मारली. मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास अंतिम मतमोजणी यादी जाहीर झाली. खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी सर्वाधिक १३ हजार ३६७ मते मिळवली. पहिल्या फेरीमध्ये लोकनेते गोपीनाथ मुंडे जनसेवा पॅनलचे उमेदवार एक हजार मताने आघाडीवर होते. त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये पंकजा मुंडे यांच्या पॅनलने सरासरी दोन हजार मताची आघाडी घेतली. पाचवी फेरी रात्री आठच्या सुमारास सुरु झाली होती. (प्रतिनिधी)
‘वैद्यनाथ’ बँक निवडणुकीत पंकजा मुंडे यांचीच बाजी
By admin | Published: June 22, 2016 4:15 AM